येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पैठणीचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिकच्या येवला शहरातील प्रसिध्द कापसे पैठणी फाऊंडेशन मध्ये २२ जानेवारीला होणा-या अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मुर्ती स्थापनेसाठी अस्सल रेशमाचे वस्त्र कापसे पैठणीच्या कारागिरांनी तयार केले असून प्रभू श्रीरामासाठी शेला व पितांबरी तयार करण्यात आली आहे.
या शेला व पितांबरी बरोबर फाऊंडेशन परिसरातील असलेल्या गोशाळेतील अस्सल शुध्द देशी २५१ किलो गावराण तुप, ५००० पणत्या तसेच पाण्यावर तरंगणा-या विटा पाठविण्यात येणार आहे.
शेला व पितांबरी तयार करायला जवळपास सहा महिन्याचा कालावधी कारागिरांना लागला, लवकरच या सर्व वस्तू लवकरच अयोध्येला पोहचविल्या जाणार असल्याचे कापसे फाऊंडेशनचे संस्थापक बाळासाहेब कापसे यांनी सांगितले