शनिवार, सप्टेंबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

टपाल कार्यालयाची या तारखेपासून नवीन फ्रँचायझी योजना सुरू होणार…..तुम्हालाही करता येईल अर्ज

by Gautam Sancheti
जानेवारी 9, 2024 | 12:05 am
in राष्ट्रीय
0
WhatsAppImage2024 01 08at8.32.41PM7PEX e1704738851696

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडिया पोस्ट हे ८९ टक्के ग्रामीण भागातील टपाल कार्यालयांसह १.५५ लाखाहून अधिक टपाल कार्यालये असणारे आणि सातत्याने टपाल कार्यालयांची मागणी असणारे जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क आहे. तरीही ग्राहकांकडून विशेषत: नव्याने विकसित होत असलेल्या शहरी समूहांमध्ये आणखी टपाल कार्यालये उघडण्याची मागणी ग्राहकांकडून निरंतर होत आहे. याची पूर्तता करण्यासाठी, पोस्ट ऑफिस फ्रँचायझी आउटलेट्स उभारण्यासाठी इंडिया पोस्ट नवीन फ्रँचायझी योजना १ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होत आहे.

विक्रयाधिकार केंद्र (फ्रँचायझी आउटलेटद्वारे) काय दिले जाऊ शकते?
अंतर्देशीय स्पीड पोस्टचे बुकिंग नॉन-सीओडी (कागदपत्रे आणि पार्सल), अंतर्देशीय रजिस्टर पत्रे, ई मनी ऑर्डर
टपाल तिकीट आणि लेखनसाहित्याची विक्री
रेव्हेन्यू स्टॅम्पची विक्री, केंद्रीय भर्ती शुल्क स्टॅम्प इ.सह किरकोळ सेवा.
पोस्टल जीवन विमा उत्पादनांसाठी थेट एजंट म्हणून कार्य करणे आणि प्रिमियम संकलनासह संबंधित विक्रीपश्चात सेवा प्रदान करणे.

फ्रँचायझी कसे बनावे?
फ्रँचायझीसाठी अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. व्यक्ती तसेच संस्था/संघटना/इतर संस्था जसे कोपऱ्यावरील दुकान, पानवाला, किराणावाला, लेखनसाहित्याची दुकाने, छोटे दुकानदार इ.
वय: 18 वर्षांपेक्षा जास्त. उत्पादनांच्या श्रेणीचे व्यवस्थापन आणि विपणन करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींची निवड करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.
व्यक्ती/संस्था भारतीय डाकसोबत करार करेल.
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त शाळेतून 10वी उत्तीर्ण. स्थानिक भाषा आणि इंग्रजीचे चांगले ज्ञान असलेली; संगणक साक्षर; स्मार्ट फोन वापराबाबत परिचित; वैध पॅन क्रमांक असलेली व्यक्ती फ्रँचायझी होण्यासाठी अर्ज करू शकते.
अर्जदाराला टपाल कार्यालयात सुरक्षा ठेव म्हणून रुपये 10,000/- जमा करावे लागतील.

फ्रँचायझीसाठी कमिशन:
फ्रँचायझींना प्रत्येक रजिस्टर पत्रासाठी 3.00 रु, 200/- पेक्षा जास्त मूल्याच्या प्रत्येक मनी ऑर्डरसाठी 5.00 रुपये, टपाल तिकीट आणि लेखनसाहित्य विक्रीवर 5% कमिशन मिळेल. बुक केलेल्या स्पीड पोस्ट लेखासाठी कमिशन दर अतिशय आकर्षक आहे आणि फ्रँचायझी त्याने केलेल्या मासिक व्यवसायाच्या 7% ते 25% कमिशन मिळवेल.

निवड निकष:
टपाल विभागीय प्रमुख हे फ्रँचायझीला संलग्न करण्यासाठी सक्षम अधिकारी असतील. इंडिया पोस्टने ‘क्लिक एन बुक’ सेवा देखील सुरू केली आहे, एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म जो ग्राहकांना स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्रे आणि पार्सल बुक करण्यास अनुमती देतो. सध्या ही सेवा महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या 141 टपाल कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे.या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना टपाल विभागाच्या https://www.indiapost.gov.in/Help/Pages/ClicknBook_individuals.aspx या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. यासाठी फक्त 50/- रुपये पिकअप शुल्क आकारणी केली जाईल. ही सुविधा 500/- रुपये पेक्षा जास्त शुल्क असलेल्या वस्तूंसाठी पिकअप सेवा मोफत प्रदान केली जाईल. यासाठी डीओपीने अधिकृत केलेल्या ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे पेमेंट करावे लागेल. जे लोक त्यांच्या वस्तूंच्या बुकिंगसाठी नियमित कामकाजाच्या वेळेत पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकत नाहीत अशा ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि काम करणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुविधा फायदेशीर ठरेल .

स्मार्ट आणि डिजिटल पार्सल वितरण प्रणाली (एएनव्हीआयटी सेवा) पार्सल वितरणात एक क्रांती घडवून आणत आहे. ही स्मार्ट आणि विश्वासार्ह वितरण प्रणाली पोस्टल परिसरातून कधीही (24/7) पार्सल/वस्तू गोळा करण्यासाठी आखली गेली आहे. या उच्च-तंत्र असलेल्या सुव्यवस्थित आणि कार्यक्षम वितरण प्रणाली द्वारे लोकांना कोणत्याही खर्चाशिवाय त्यांच्या पार्सलची ओटीपी आधारित डिलिव्हरी प्रदान केली जाईल. ही सेवा सध्या ठाणे शहरातील ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस, नवी मुंबई शहरातील वाशी सब पोस्ट ऑफिस आणि पुणे शहरातील इन्फोटेक पार्क सब पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. एएनव्हीआयटी सेवा मुंबई जीपीओ, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, घाटकोपर पश्चिम आणि मुंबईतील आणखी 5 ठिकाणी सुरु केली जाणार असून ही सेवा नवीन क्षितिजांवर आपले पंख पसरवण्यासाठी सज्ज आहे.

निर्यात उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि निर्यात संबंधी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तसेच निर्यातदारांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टपाल विभागाने महाराष्ट्र राज्य आणि गोव्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये डाक घर निर्यात केंद्रे (डीएनकेएस) सुरू केली आहेत. पार्सल पॅकेजिंग मटेरियल, पोस्टल बिल ऑफ एक्सचेंज (पीबीई), सीमाशुल्क क्लियरन्स सुविधा, मोठ्या प्रमाणात ग्राहकांसाठी पिकअप सुविधा इत्यादी सुविधा निर्यातदारांना एकाच छताखाली पुरवल्या जात आहेत. आजपर्यंत महाराष्ट्र आणि गोवा राज्यात 69 डाक घर निर्यात केंद्रे (डीएनकेएस) कार्यान्वित झाली आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबत झाला हा निर्णय

Next Post

देशातील नदी क्रूझ पर्यटनाच्या विकासासाठी इतक्या कोटी रुपयांची गुंतवणुक होणार…असे आहे फायदे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने लाचखोरी प्रकरणात एलआयसीच्या या अधिका-याला दिली ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 5, 2025
IMG 20250904 WA0382 1
संमिश्र वार्ता

पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव….परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग

सप्टेंबर 5, 2025
CM
संमिश्र वार्ता

आता राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ …१५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट

सप्टेंबर 5, 2025
A90 LE KV e1757035342319
संमिश्र वार्ता

आयफोनसारख्या डिझाईनसह हा फोन लाँच….६,३९९ रुपये आहे किंमत

सप्टेंबर 5, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना आता इतकी मुदत…

सप्टेंबर 5, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना आनंदाची वार्ता समजेल, जाणून घ्या, शुक्रवार, ५ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 4, 2025
IMG 20250904 WA0311
संमिश्र वार्ता

या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

सप्टेंबर 4, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

सप्टेंबर 4, 2025
Next Post
Untitled 61

देशातील नदी क्रूझ पर्यटनाच्या विकासासाठी इतक्या कोटी रुपयांची गुंतवणुक होणार…असे आहे फायदे

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011