इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महानिर्मितीमधील भरती परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केल्यामुळे पुन्हा हा विषय एकदा चर्चेत आला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या पेपरफुटीचा दावा केला असून त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पेपरफुटीच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.
राज्यात पेपरफुटीचे मागे रॅकेट असून त्यात हे पेपर फुटीचे प्रकार याअगोदरही घडले आहे. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीचा पेपर फुटला, असा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने करुन पुरावे देण्याचेही जाहीर केल्यामुळे आता काय कारवाई होणार व त्यातून सरकार काय बोध घेतो हे महत्त्वाचे आहे. समितीने फुटलेला पेपर आमच्याकडे असल्याचेही सांगितले आहे. १९ ते २२ जून दरम्यान महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीच्या विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा निकालही जाहीर झाला. आयबीपीएसनी ही परीक्षा घेतली होती. समितीने सांगितले की, याबाबत १३ ऑगस्टला पेपर फुटल्याचे सांगितले होते.
याअगोदर काही मुलांची नावेसुद्धा दिली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन दिले होते. मात्र काहीच चौकशी केली नाही. आज आम्हाला पुरावा सापडला असल्याचे समितीने सांगितले आहे. आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेल्या व्टीट मध्ये म्हटले आहे , MahaGenco परीक्षा IBPS ने घेतली होती. इतक्यातच त्याचा अंतिम निकाल जाहीर झाला पण या परीक्षेचा फुटलेला पेपर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे आहे. पेपरची शहानिशा आम्ही करतो आहोत, परंतु पेपर फुटल्याचे निष्पन्न होत असताना सरळसेवा भरतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. येत्या काळात इतर पदभरतीचे फुटलेले पेपर आम्ही जाहीर केल्यास नवल वाटायला नको. MahaGenco च्या फुटलेल्या पेपरबाबत विस्तृत माहिती थोड्या वेळात जाहीर करू…..