इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल १० जानेवारीला दुपारी चार वाजता लागल्याची चर्चा आहे. या निकालाची सविस्तर प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याअगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची गुप्त भेट रविवारी झाली होती. त्यानंतर चर्चांना उधाण आले होते. पण, आता या निकालाचा मुहूर्त ठरला आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. या निकालापूर्वीच नार्वेकर आजारी पडल्याने विरोधकांनी टीका केली होती. विधानसभा अध्यक्षांचे आजारी पडणे हा राजकीय भूकंपाचा भाग आहे, अशी टीका विरोधकांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा या निकालाची चर्चा सुरु झाली आहे.
रविवारी नार्वेकर आजारी असूनही ते वर्षा बंगल्यावर गेले होते. या दोघांची भेट ठरलेली नव्हती; पण अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोन दिवसांनी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल आहे. अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. त्यापूर्वीच नार्वेकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन चर्चा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोघांच्या बैठकीत आमदारांच्या अपात्रतेवरच चर्चा झाल्याचे समजते.