नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरधाव दुचाकी घसरल्याने २५ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात पेठरोडवरील दत्तनगर भागात झाला होता. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हंसराज प्रल्हाद सिंग (रा.दत्तनगर पेठरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. हंसराज गेल्या ८ डिसेंबर रोजी दत्तनगर परिसरातून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. भरधाव दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. रूग्णालयातील औषोधपचारानंतर त्यास घरी नेण्यात आले होते.
मात्र रविवारी (दि.७) अचानक त्रास होवू लागल्याने त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात हलविले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत हवालदार पी.एस.जगताप यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक सानप करीत आहेत.