इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळया निमित्त २२ जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांकडे दारिद्य रेषेखालच्या कुटुंबांना मोदींनी एक हजार रूपये द्यावे अशी मागणी केली. यावेळी ते म्हणाले की, हे पैसे दिले तर २२ तारखेला त्यांना दिवाळी साजरी करता येईल.
पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी ही मागणी केली. अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याचे निमंत्रण मिळाले का या प्रश्नावर ते म्हणाले की मला वर्तमानपत्रातून वाचतोय की मला आमंत्रण येणार आहे. मला आतापर्यंत कुठलंही आमंत्रण आलेलं नाही. पण, मी वाट पाहतोय असे ते म्हणाले.
याअगोदर पंतप्रधान मोदी यांनी टाळया थाळया वाजवण्याचे मिशन सांगितले तसं हेही मान्य करु फक्क आमची मोदींना एवढीच विनंती आहे की दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना त्यांनी एक हजार रुपये द्यावे जेणेकरुन त्यांना दिवाळी साजरी करता येईल.