नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दोन दिवसापासून नांदगाव तालुक्यात ढगाळ वातावरण असून आज सकाळी नांदगाव शहर व परिसरात दाट धुक्याची चादर पसरली. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सूर्याचे दर्शन झालेले नव्हते.
या धुक्यामुळे कांदा व इतर शेती पिकांवरही रोगांचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. धुके एवढे दाट होते की काही फुट अंतरापर्यंत काहीच दिसत नसल्याने वाहने दिवे लावून चालवावी लागत होते.
मॉर्निंग वाकसाठी आलेल्या नागरिकांना मात्र या वातावरणाचा सुखद अनुभव घेतला..