नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारन ७ डिसेंबर रोजी निर्यात बंदीची घोषणा केल्यानंतर महिनाभरात तब्बल ५०० कोटींचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या बंदीच्या निर्णयाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.
निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी व व्यापारी यांनी केली मात्र केंद्र सरकारने अद्याप त्यावर काहीही तडजोड केलेली नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये प्रचंड संताप आहे. निर्यात बंदी पूर्वी शेतक-यांना कांद्याला ४००० रुपयांचा दर मिळत होता मात्र तो निम्म्याने खाली आला आहे.
या एक महिन्याच्या काळात सुमारे ५०० कोटींचे शेतक-यांच नुकसान झाले असून केंद्राने तातडीने निर्यात बंदी उठवावी अशी मागणी होत आहे.