बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई शहरावर लक्ष केंद्रित…या मेळाव्यात सर्व नेत्यांनी केला निर्धार

by India Darpan
जानेवारी 8, 2024 | 11:37 am
in राज्य
0
IMG 20240108 WA0157 2

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकांचे युध्द आपल्याला जिंकायचे आहे असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात व्यक्त केला. मुंबईमध्ये पक्ष ज्यापध्दतीने वाढायला हवा होता. तसा वाढला नाही, आमचं लक्ष फक्त ग्रामीण भागाकडे राहिले. आता समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जे काम सुरू आहे त्यातून आपल्याला नक्कीच बळ मिळेल असा मला विश्वास अजितदादा पवार यांनी मुंबईत व्यक्त केला.

मुंबईतील षनमुखानंद सभागृहात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता सन्मान मेळावा संपन्न झाला यावेळी अजितदादा बोलत होते.यावेळी ते म्हणाले की, आता आपल्याला वेळ कमी आहे. सुरुवात चांगली झाली आहे त्यामध्ये सातत्य ठेवा. काम करताना खटका उडत असतो मात्र तो समजून घेऊन काम करा.आठवडयातील एक दिवस राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार मुंबईसाठी वेळ देतील. कार्यकर्ते कामाला लागले की काय होते हे आज दिसले. शिवसेना फक्त मुंबईत होती त्यानंतर ती कोकणात पोचली. आपल्यातही ती जिद्द आहे आपणही तसे काम सुरू करु. सकाळी मुंबईतील वेगवेगळ्या भागात जाऊन लोकहिताच्या कामांची पाहणी आपण करू शकतो. याबरोबरच मुंबापुरीला एक रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही असा शब्दही अजितदादा पवार यांनी दिला.

धारावीतील टेंडरमुळे एका उद्योगपतीला फायदा होणार आहे अशी बोंब मारली जात आहे. त्याच्या खोलात जाऊन माहिती घेऊ. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. प्रश्न सोडविण्याची ताकद आणि धमक आपल्यात आहे. काहीजण आज करतो उद्या करतो सांगत असतात मात्र आपले काम तसे नाही लगेच निर्णय असे आपले काम आहे .महायुतीच्या माध्यमातून सरकार राज्यात काम करत आहेत. मुंबईत विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेत योग्य ती आणि म्हणावी अशी संख्या गाठू शकलो नाही. आपल्या वॉर्डात निवडणूक लढणार्‍या व्यक्तीच्या पाठीशी ताकद उभी करायला हवी असेही मत अजितदादा पवार यांनी मांडले.

समीरभाऊंच्या पाठीशी उभे राहून एकदिलाने काम केले तर पक्षाची ताकद मुंबईत उभी राहिल. एक एक पायरी म्हणजे कार्यकर्ता असतो. तो नेत्याला जोडणारा दुवा असतो. सर्व जाती धर्माच्या लोकांचा आपण आदर करतो. सर्व सणांमध्ये सहभागी होतो. हे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे आले पाहिजे. सत्तेकरता आम्ही सत्तेत गेलो नाही. सर्व सामान्य लोकांची कामे व्हायला हवी त्याकरता निर्णय घेतला. विरोधाला विरोध करायचा, मोर्चे काढायचे, यातून प्रश्न सुटणार आहे का? असा सवालही अजितदादा पवार यांनी विरोधकांना केला.

मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले तर परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते – प्रफुल पटेल
या कार्यक्रमात बोलताना खा. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले की, तुमच्यासोबत आम्ही आहोतच. मात्र मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले तर परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते या षण्मुखानंद सभागृहाचे आणि पक्षाचे एक वेगळे नाते आहे. इथल्या बैठकीत अजितदादा पवार यांनी एल्गार पुकारला होता. त्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद अजितदादा पवार यांना राज्यातून मिळाला होता. राज्यातील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी अजितदादा पवार यांच्या पाठीशी आहे हे सिध्द झाले आहे.

१९९१ मध्ये अजितदादा आणि मी एकत्र लोकसभेत होतो हे सांगतानाच अजितदादा पवार यांनी पक्षाची ताकद वाढवण्याचे काम केले हे स्पष्टपणेच प्रफुल पटेल यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईकडे लक्ष कमी राहिले आहे. वारंवार कॉंग्रेसच्या सोबत राहिलो त्यामुळे कमी जागा लढवायचो. पसंतीच्या जागा कधीच मिळत नव्हत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांनी ग्रामीण भागात वाढवली आहे. आता शहराकडे अजितदादा पवार यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी शहराकडे लक्ष घातले असल्याने त्यादृष्टीने काम करायचे आहे. समीरभाऊ यांनी काम सुरू केले आहे त्यामुळे आज आज खरी लोकं सभागृहात दिसत आहेत असेही प्रफुल पटेल म्हणाले.

येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील – सुनिल तटकरे
समीरभाऊ ज्यापध्दतीने तुम्ही या मुंबई शहरात काम करत आहात ते लक्षात घेता आता जेवढे नगरसेवक आहेत त्यापेक्षा तिप्पट नगरसेवक पुढच्या निवडणुकीत असतील अशी ताकद उभी राहिली असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
धर्मनिरपेक्ष विचारापासून फारकत न घेता राज्याच्या विकासासाठी आम्ही निर्णय घेतला. राजकीय विचारधारा घेऊन गतीमान भूमिका घेऊन काम करत आहोत.सरकारच्या माध्यमातून जनकल्याण योजना राबवल्या जात आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाची सोडवणूक केली आहे. अल्पसंख्याक समाजाच्याहिताची सोडवणूक दादा तुम्ही निधी देऊन केली आहे हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसची पदे घेण्यासाठी स्पर्धा होते याचा अर्थ पक्षाची ताकद वाढत आहे हेही समीर भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिले.
जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला त्यावेळी जो पक्षाचा स्ट्राईक रेट होता त्यापेक्षा अधिक स्ट्राईक रेट अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा तयार होईल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

उडान तय करेगी आसमान किसका है – छगन भुजबळ
आता राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. न्यायालयात आपल्याच बाजूने निकाल लागेल असा विश्वास व्यक्त करतानाच एक तरी खासदार आपल्याला मिळाला पाहिजे ती जबाबदारी आपण घेतली आहे ती घेऊन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. “मै उस पुराने जमाने का सिक्का हू, मुझे फेक ना देना, हो सकता है भले बुरे दिनो मैंही चल जाऊं ” त्याचप्रमाणे रात नही ख्वाब बदलता है, मंजिल तो वही रहती सिर्फ कारवा बदलता है… किस्मत बदले या ना बदले वक्त जरुर बदलता है… अशा शायरीतून छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना साद घातली. एकमेकांचे पाय खेचू नका. खेकडयासारखे वागू नका एकमेकांना साथ द्या. एकजूट होऊन काम केले तर यश निश्चित तुमचे आहे. शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा आम्ही बदलली नाही. अजितदादा पवार आणि आम्ही सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. भविष्यात नगरसेवक, आमदार निवडून आणायचे आहेत. घरी बसला आणि मोबाईलवर मेसेज पाठवून उपयोग नाही. ‘लोकांना लढणारी माणसे आवडतात रडणारी नाही’ तुम्ही लढा द्याल तेव्हा लोक तुमच्या सोबत येतील असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या हे मी बोललो आणि सगळे नेते तेच बोलत आहेत फक्त मी जास्तीचे आणि समाजाला समजेल असे बोलत आहे. तुम्ही ओबीसींमधील आरक्षण कशाला मागताय. तुम्हाला दिले होते ना… ते टिकले नाही मात्र त्यावेळी असलेल्या त्रुटी दूर केल्या जात आहेत. राजकारण कोण करत असेल तर पंचायत होईल असे समजवताना गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मी आज लढतोय का?… मंडल आयोगासाठी लढलो ना…पवारसाहेबांसोबत लढलो. कुणाच्या हक्कावर गदा येणार नाही असे काम आपल्याला करायचे आहे असेही छगन भुजबळ म्हणाले. लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत. कुणाच्या दादागिरीकडे लक्ष देऊ नका… उडान तय करेगी आसमान किसका है…अशा शब्दात पक्षाचा इरादा छगन भुजबळ यांनी स्पष्ट केला.

राष्ट्रवादी काँग्रेस वर्चस्व दाखवेल – समीर भुजबळ*
हे वर्ष निवडणुकीचे असून मुंबईत पक्षाची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादीला एक लोकसभा दिली तर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी ग्वाही देतानाच मुंबईतील १५ विधानसभा मतदारसंघात आमदार आणि महानगरपालिकेत ७५ जागा निवडून आणू असा शब्दही मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांनी पक्षाला दिला. मुंबईत अतिशय कमी वेळेत सर्व समावेशक अशी कार्यकारिणी आपण जाहीर केली आहे. मुंबईतील अनेक कार्यकर्त्यांना अजून सामावून घ्यायचे असल्याचेही समीर भुजबळ यांनी सांगितले.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्ता संवाद मेळावा घेऊन आम्ही पक्षाच्या नेत्यांना दिलेला शब्द पंधरा दिवसात पूर्ण केला आहे असेही समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले. पक्षाने कमिट्या, महामंडळावर कार्यकर्त्यांना संधी दिली तर अजून पक्षवाढीला चालना मिळेल असेही समीर भुजबळ यावेळी म्हणाले.यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, महिला कार्याध्यक्षा आरती साळवी, मनिषा तुपे, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, शिवाजीराव नलावडे यांनी आपले विचार मांडले.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य संवाद मेळावा पार पडला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा मुंबई प्रभारी छगन भुजबळ, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव,माजी आमदार पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, शिवाजीराव नलावडे, महिला कार्याध्यक्षा आरती साळवी, मनिषा तुपे, युवक अध्यक्ष सुनिल गिरी, आदींसह पक्षाचे सहा जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोदींवरील टीका मालदीवच्या तीन मंत्र्यांना भोवली…सोशल मीडियावर पोस्ट टाकणे पडले महागात

Next Post

कांदा निर्यात बंदीला एक महिना पूर्ण….. इतक्या कोटींचे झाले नुकसान (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Screenshot 20240108 110428 WhatsApp

कांदा निर्यात बंदीला एक महिना पूर्ण….. इतक्या कोटींचे झाले नुकसान (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011