इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत. यासाठी माणसाला खूप कष्ट करून पैसे मिळवावे लागतात. निवारा म्हणजे घर हा आयुष्यातून एकदा बांधले की काळजी किंवा त्रास नसतो, तसेच कपडे वर्षातून एकदा घेतले तरी पुरे होतात. मात्र जगण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी दररोज जेवण करावेच लागते. अनेकांना जेवण ही आनंददायी गोष्ट वाटत असली तरी काही जणांना जेवणाची कटकट किंवा त्रास देखील वाटतो. कारण जेवण केल्यावर आपण आणखी लठ्ठ होऊ अशी भीती त्यांना वाटते, मात्र आता जेवण करण्याऐवजी एक गोळी घेतली की पोट भरणार आहे.
लठ्ठपणावर उपाययोजना म्हणून ही गोळी उपयुक्त ठरू शकते, असे संशोधकांचे मत आहे. औषधी गोळीप्रमाणे ही गोळी काम करेल.
हार्वर्ड विद्यापीठाचे बायो इंजिनिअरींगचे प्राध्यापक श्रिया श्रीनिवास यांनी हा आगळावेगळा शोध लावला आहे. हार्वर्ड विद्यापीठ ही अमेरिकेतील सुमारे साडेचारशे वर्षापेक्षा जुनी उच्च शिक्षण संस्था जगभरात तिचा नावलौकिक आहे. तेथे वेगवेगळ्या विषयांवर संशोधन केले जाते. या विद्यापीठातील मॅसॅच्युसेटर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत संशोधन करताना श्रीनिवास यांनी या महत्त्वपूर्ण विषयावर शोध लावला असून या संशोधनाला लवकरच जगभरात मान्यता मिळेल, अशी त्यांना अपेक्षा असून खात्रीही वाटते.
खरे म्हणजे जठर किंवा मेंदू यांच्या संबंधातून आपल्याला पोट भरल्याची जाणीव होते, जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा मेंदूला पोट भरल्याची संवेदना मेंदूकडे संवेदना तयार किंवा निर्माण होते, मात्र आता ही गोळी घेतल्यावर पोटामध्ये काही विशिष्ट हालचाली होतील, त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटल्याची संवेदना मेंदूमध्ये जाईल. सिल्व्हर ऑक्साईड बॅटरीने ही गोळी संचलित केली जाणार आहे. त्यामुळे अर्ध्या तासात पोटात कंपने निर्माण होईल, पोट भरल्याची जाणीव होईल. मात्र यावर आणखी संशोधन करावे लागणार आहे, असे दिसून येते. कारण यामध्ये अनेक अडचणी जाणवतात.