इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचा भव्य मेळाव्याच्या प्रसिध्द चित्रपट अभिनेते अनुपम खेर रविवारी हजेरी लावत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी रोटरीच्या सेवाकार्याला १०० पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. उत्तम सेवाकार्य करण्याकरिता मन प्रसन्न, समाधानी असण्याची आवश्यकता असते. मला २६ वर्षांनी नाशिकला येण्याची संधी मिळाली. ४० वर्षात ५४० चित्रपटात भूमिका केल्या. सारांश चित्रपटाने माझ्या जीवनात परिवर्तन घडवले. प्रेक्षकांना हसवणे सर्वात अवघड असून ते आव्हानात्मक वाटते. असे सांगत त्यांनी पुढील २० वर्षात मी निवृत्त होणार नाही व जीवनगौरव पुरस्कार स्वीकारणार नाही असे सांगत त्यामागचे कारणही सांगितले. यावेळी अनुपम खेर म्हणाले, कारण कला, कल्पकता यांना वयाचे बंधन नसते.
यावेळी त्यांनी ३७० वे कलम हटवल्याने कश्मिरी पंडित मोकळा श्वास घेत आहेत. कश्मिरी फाईल्स चित्रपटात मला काश्मिरी जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी व समाधान मिळाले असे सांगून विविध अनुभव व्यक्त केले. उद्योजक पियुष सोमाणी, पल्लवी उटगी यांनी कल्पकता, श्रम व सकारात्मक विचारसरणीने यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले. मान्यवर उपस्थितांना संबोधित केले. सायंकाळी समारोपापूर्वी परिसंवाद झाला.
डॉ. राजेश पाटील आगामी डिस्क्ट्रीक्ट गव्हर्नर २०२६ – २७ या वर्षासाठी डिस्क्ट्रीक्ट गव्हर्नर पदासाठी अटीतटीची निवडणूक झाली. त्यात जळगावचे रोटेरियन डॉ.राजेश पाटील जास्त मते मिळवून निवडून आले. त्यांचा सत्कार आशा वेणूगोपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. करमणुकीच्या कार्यक्रमात अनेक देशातून आलेल्या तरुण तरुणींनी नृत्ये, गायन करून उपस्थितांची मने जिंकली. या परिषदेच्या निमित्ताने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून रोटरी क्लबतर्फे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आशा वेणूगोपाल व पदाधिकाऱ्यांनी अर्पण ब्लड बँकेला रक्त संकलन गाडी प्रदान केली.अर्पण ब्लड बँकेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.