इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई पोलिसांनी शुक्रवारी नाशिकमध्ये एम. डी. ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई केल्यानंतर शनिवारी नाशिक रोड पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला आहे. या ड्रग्जची किंमत जवळपास ३०० कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गावातच ही दुसरी कारवाई केल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. या दोन कारवाईमुळे नाशिक ड्रग्जच्या विळख्यात सापडला तर नाही ना? असा सवालही उपस्थितीत केला जात आहे. गुन्हे शोध पथकाने या कारखाना शोधून काढत ही कारवाई केली.
शुक्रवारी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ जणांना अटक करुन ३०० कोटीचे दीडशे किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले होते. या कारवाईत झिशान इक्बाल शेख या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर ही दुसरी कारवाई झाली आहे. फक्त शुक्रवारी मुंबईच्या पोलिसांनी केली होती तर शनिवारी नाशिकच्या पोलिसांनी केली. ड्रॅग्स रॅकेट चालवणारा ड्रॅग माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्यानंतर पोलिसांनी या ड्रग्ज रॅकेटचा शोध सुरु केला आहे. त्यात मुंबई पोलिसांच्या हाती शुक्रवारी हा कारखाना लागला तर शनिवारी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली.
असे आहे ललित पाटील याचे कारनामे
कुख्यात ड्रग्स माफिया ललित पाटील अनेक कारनामे केले आहे.ललितला तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२० मध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवाडा कारागृहात करण्यात आली. पण पुढे प्रकृतीच्या कारणाने त्याला ससून रुग्णालयात भरती करण्यात आले. गेल्या दीड वर्षांपासून तो ससून रुग्णालयात कैद्यांसाठी असलेल्या १६ नंबरच्या वॉर्डमध्ये उपचार घेत होता. विशेष म्हणजे त्याला आधीच डिस्जार्ज द्यायला पाहिजे होता. मात्र ससूनमध्ये राहून ड्रग्स रॅकेट चालविण्यासाठी त्याने डॉक्टरांना मॅनेज केले.
डॅाक्टरांना पैसे द्यायचा
त्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा मध्यस्थ म्हणून वापर केला. हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुद्धा काही साधासुधा नाही. त्यानेही चांगली माया जमवलेली आहे. तो ब्रांडेड कारमधून रुग्णालयात येतो. त्यानेच अतिवरिष्ठांना मॅनेज केले आणि ललित पाटीलला ससूनमध्ये ठेवण्यासाठी दररोज ७० हजार रुपये मिळतील असे सांगितले. त्यानुसार ललित पाटील या रुग्णालयातील अतिवरीष्ठ डॉक्टरांना दररोज ७० हजार प्रमाणे आठवड्याचे पैसे रोख द्यायचा.
मेफेड्रॉन ड्रग्सची तस्करी
त्या जोरावर ललित पाटील ससून रुग्णालयातून मेफेड्रॉन ड्रग्सची तस्करी करायचा, असे उघडकीस आले आहे. या वॉर्डात त्याची पूर्ण बडदास्त ठेवण्यात आली. विशेष म्हणजे ड्रग्स नेटवर्क संपर्कात ठेवण्यासाठी त्याच्याकडे सव्वादोन लाख रुपयांचे मोबाईल्सही होते.