मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरात अवैध नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या ४२ जणांवर पोलिसांनी केली हद्दपारीची कारवाई…

by India Darpan
जानेवारी 7, 2024 | 3:08 pm
in क्राईम डायरी
0
Untitled 50

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात अवैध नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या ४२ जणांवर पोलिसांनी केली हद्दपारीची कारबाई केली. येत्या १५ जानेवारीला नाशिक शहरात सर्वत्र मकर संक्रांत सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नागरीकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. परंतु, पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारीक मांजाऐवजी नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधीत मांजाची विक्री काही इसमांकडून केली जात असल्याचे यापुर्वी आढळून आले आहे. पतंग उडवितेवेळी सदर मांजाचे घर्षण होऊन तो तुटतो व तो उंच इमारती, झाडे अन्यथा इतरत्र ठिकाणी अडकतो. अशा तुटलेल्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोका निर्माण होऊन पक्षी, प्राणी, नागरीक, बालके, वयोवृद्ध, महिला वाहनस्वार यांचे जखमी होण्याचे अथवा प्राण गमाविण्याचे घटना घडल्या आहेत. तसेच, अशा प्रकारच्या मांजामुळे शाळकरी मुले व दुचाकीस्वार हे देखील अपघात होऊन जखमी अथवा गतप्राण झालेले आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ही कारवाई पोलिसांनी केली आहे.

या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसा आयुक्त संदिप कर्णिक यांनी कठोर कारवाई करणेबाबत आदेश दिलो होते. त्यानंतर किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, नाशिक शहर व मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, नाशिक शहर यांचे सुचनेप्रमाणे परिमंडळ १ व २ मधील पंचवटी, सरकारवाडा, अंबड व नाशिकरोड विभागातील नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेला मांजा विक्री करणाऱ्या एकूण ४२ आरोपीतांवर हद्दपरीची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी ०७ इसमांवर, डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर यांनी २३ इसमांवर, शेखर देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर यांनी ०६ इसमांवर व आनंदा वाघ, सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग, नाशिक शहर यांनी ०६ इसमांवर सदरची कारवाई केली आहे.

तरी, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कुणीही प्रतिबंधीत नायलॉन अथवा काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मांजाची विक्री अथवा वापर करू नये असे आवाहन परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त, किरणकुमार चव्हाण तसेच परिमंडळ २ च्या पोलीस उप आयुक्त, मोनिका राऊत यांनी केले असून प्रतिबंधीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमांवर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

६४ लाख रुपयाच्या पादूका घेऊन छल्ला श्रीनिवास शास्त्री आठ हजार किलोमीटर पदयात्रा करीत अयोध्येत या तारखेला पोहचणार

Next Post

नाशिक- मुंबई- आग्रा महामार्गावर टेंपोच्या धडकेत एक जण जखमी

Next Post
IMG 20240107 WA0157 1 e1704620783490

नाशिक- मुंबई- आग्रा महामार्गावर टेंपोच्या धडकेत एक जण जखमी

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
Untitled 5

NEET परीक्षा पुढे ढकलली…न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

जून 2, 2025
वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक 1 1 1024x683 1

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक….नियोजनाची सुरु झाली तयारी

जून 2, 2025
crime 1111

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळयातील दीड लाखाची सोनसाखळी केली लंपास

जून 2, 2025
crime1

साड्या घेण्यासाठी आलेल्या ग्राहक महिलेने दुकानदार महिलेचे अंगावरील दागिणे असे केले लंपास…

जून 2, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

सिक्कीम येथे भुस्खलनामुळे राज्यातील अडकलेले ४० पर्यटक सुखरूप…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011