इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सोमवारी ८ जानेवारी रोजी लंडन, युनायटेड किंगडम (यूके) च्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना होतील. त्यांच्यासमवेत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, सेवा मुख्यालय, सेवा मुख्यालय, संरक्षण विभाग आणि संरक्षण उत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले संरक्षण मंत्रालयाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल.
या भेटीदरम्यान, संरक्षणमंत्री त्यांचे यूकेमधील समकक्ष संरक्षण राज्य सचिव ग्रँट शॅप्स यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते संरक्षण, सुरक्षा आणि औद्योगिक सहकार्याच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
राजनाथ सिंह हे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेतील तसेच यूकेचे परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास व्यवहार मंत्रालयाचे सचिव डेव्हिड कॅमेरून यांची देखील भेट घेणार आहेत. संरक्षणमंत्री यूके संरक्षण उद्योगांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग नेत्यांबरोबर संवाद साधणार आहेत. संरक्षणमंत्री या दरम्यान तेथील भारतीय समुदायाची देखील भेट घेतील.