इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चेन्नई : दसरा, दिवाळी सणाला आणि कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना छोट्या-मोठ्या भेटवस्तू देतात. परंतु अलीकडच्या काळात काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू देखील देत असल्याचे दिसून येते. अर्थात कंपनी सुद्धा मोठी आर्थिक उलाढाल करणारी असते. तसेच मालक हा सुद्धा दिलदार असावा लागतो. दक्षिण भारतात तामिळनाडूमध्ये एका दिलदार कंपनी मालकाने आपल्या ५० कर्मचाऱ्यांना चक्क ५० कार भेट दिल्या. सध्या याची चांगली चर्चा सुरू आहे.
आयटी 2 – आयटी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या आयटी कंपनीचे संचालक मुरली आणि त्यांच्या पत्नी यांनी सुमारे २४ वर्षांपूर्वी या कंपनीची स्थापना केली. या कंपनीला सुरुवातीला अनेक अडचणींना सामना करावा लागला. मात्र आता कंपनीने चांगली भरारी घेतली असून ती खूप नफ्यात आहे. त्यामुळे संचालक मुरली यांना यांनी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर खुश होऊन काही कर्मचाऱ्यांना कार सारखे मोठे बक्षीस दिले आहे.
विशेष म्हणजे या कारमध्ये एरिनाची स्विफ्ट, ब्रेझा, एर्टीना, मारुती सुझुकी, नेक्साच्या इनिस,बलनो, फ्रॅक्स आणि विटारा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तसेच यापूर्वी देखील त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना कार भेट दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जुन्या कर्मचाऱ्यांना ३३ टक्के शेअर्स देण्याचा निर्णय देखील मुरली यांनी घेतला आहे. कर्मचाऱ्यांना कार मिळाल्याने त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या कर्मचाऱ्यांना नुकत्याच कारच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या असून या संदर्भात सोशल मीडियावर फोटो देखील प्रसिद्ध झालेले आहेत.