इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे गटात गेलेल्या नेत्यांविरुध्द कारवाई थांबेल असे वाटत असतांना आयकर विभागाने मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. ही पहिली कारवाई शिंदे गटाच्या वाशिम – यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेवर केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहे. आयकर विभागाने त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठावली आहे.
याअगोदर त्यांना २९ डिसेंबर रोजी आयकर विभागाने भावना गवळी यांनी नोटीस दिली होती. त्यात ५ जानेवारी पर्यंत म्हणणे मांडायला सांगितले होते. मात्र भावना गवळी प्रत्यक्ष उपस्थितीत राहिल्या नाही. त्यांनी प्रतिनिधी पाठवून उत्तर दिले होते. मात्र त्यावर आयकर विभागाचे समाधान झाले नाही त्यानंतर ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.८ कोटी २६ लाख रुपयाचा आयकर न भरल्यामुळे ही कारवई केल्याचे बोलेल जात आहे.
महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण या संस्थेत २४ कोटी रुपयांची अफरातफर आणि त्यातून सात कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार १२ मे २०२० रोजी गवळी यांनी रिसोड पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र या संदर्भातील आयकर भरला नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांना आयकर विभागाने ही नोटीस दिली होती. त्यानंतर आता ही कारवाई केली आहे.
या कारवाईने शिंदे गटाच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर कारवाई थांबेल असे वाटत असतांना ही कारवाई झाल्यामुळे त्यांची चिंताही वाढली आहे..