इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महादेव बुक बेटिंग अॅप घोटाळ्याच्या संर्दभात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या तक्रारीत छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव आहे. आरोपपत्रानुसार या प्रकरणातला एक आरोपी सुभम सोनी याने प्रवर्तकांकडून सुमारे ५०८ कोटी रुपये भरल्याचा खुलासा केला आहे.
तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या जबाबाच्या आधारे आरोपपत्रात भूपेश बघेल यांच्या नावाचा किमान चार ते पाच वेळा उल्लेख आहे. सुभम सोनी याने भूपेश बघेल यांना मोठी रोख रक्कम पोहोचवण्याची सूचना केली असल्याचं म्हटलं आहे.
भुपेल यांचे नाव आल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. याअगोदरही त्यांचे नाव विधानसभा निवडणुकीच्या वेळी आले होते. पण, त्यावेळेस त्यांनी या आरोपाचे खंडण केले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांचे नाव आरोपत्रात आल्यामुळे काँग्रेसनेही भाजपवर जोरदार टीका केली आहे.