इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज कंपनी क्षेत्रातल्या प्रमुखांना आणि उद्योगपतींना भारतीय संस्थांना प्राधान्य देऊन त्यांना मदतीचा हात देण्याचे तसेच त्यांची प्रचंड बौद्धिक क्षमता ओळखण्याचे आवाहन केले. भारतातील तरुणांची अतुलनीय क्षमता आणि बुद्धी यावर प्रकाश टाकत धनखड यांनी असे प्रतिपादन केले की संशोधन आणि विकास हे प्रामुख्याने पश्चिमेकडील जगातील कॉर्पोरेट्सद्वारे चालवले जाते.
उपराष्ट्रपती आज हिमाचल प्रदेशातील हमीरपूर शहरातील एनआयटी येथील मेळाव्याला संबोधित करत होते. धनखड यांनी भारताच्या अतुलनीय लोकसंख्याशास्त्रीय फायद्यावर भर देत यापैकी ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, असे सांगितले. उपराष्ट्रपतींनी कलम ३७० आणि ३५ A रद्द केल्याच्या निर्णयाचे कौतुक केले आणि हे राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे सांगितले.
कलम- ३७० रद्द केल्यानंतर झालेल्या सकारात्मक परिवर्तनावर प्रकाश टाकताना उपराष्ट्रपती धनखड यांनी नमूद केले की जम्मू आणि काश्मीरमध्ये जी २० बैठकांचे आयोजन केल्यामुळे राज्यातील पर्यटनाला उल्लेखनीय चालना मिळाली आहे. २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणावर सरकारने लक्ष केंद्रित करण्याबद्दल उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, भारतीय महिला अंतराळापासून ते लढाऊ विमानांच्या वैमानिक ते जागतिक कॉर्पोरेट व्यवस्थेपर्यंत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रभावी योगदान देत आहेत.