इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
“मूनवॉक ते सन डान्सपर्यंत, आदित्य एल 1 इस्रो ची यशोत्रयी अधोरेखित करते. इस्रोच्या एकापाठोपाठ द्रुतगतीने पूर्ण झालेल्या तीन यशोगाथा म्हणजे… चांद्रयान 3, XPoSat आणि लॅंगरेज पॉइंटवर आदित्य एल 1”. अशा शब्दात केंद्रीय अंतराळ मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी, आदित्य एल 1 लॅंगरेज पॉईंटवर निर्धारित गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर लगेचच पहिला प्रतिसाद दिला होता.
व्हायरल झालेल्या एका ट्विटमध्ये मंत्री म्हणाले, “मून वॉक ते सन डान्सपर्यंत! भारतासाठी हे वर्ष किती गौरवशाली वळणाचे ठरले आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, टीम इस्रोने लिहिलेली आणखी एक यशोगाथा. आदित्य एल 1 त्याच्या अंतिम कक्षेत पोहोचले आहे. सूर्य-पृथ्वी संबंधाचे गूढ उलगडण्यासाठी “.आदित्य एल 1 चे यश हे सूर्याचे गूढ शोधण्याचा एक क्रांतिकारी प्रयत्न आहे. हे रहस्य आतापर्यंत एकतर समजले नव्हते किंवा केवळ परीकथा आणि लोककथांचा भाग बनले होते, असे प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींच्या मालिकेत मंत्री म्हणाले होते.
अंतराळ संशोधन क्षेत्रातील सर्व शास्त्रज्ञ आदित्य एल 1 मोहीमेकडून येणाऱ्या माहितीची आतुरतेने वाट पाहत आहेत, असे या मोहिमेचे महत्व सांगताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले हे मिशन आपल्याला सौर उष्मा, सौर वादळ, सौर फ्लेअर्स, कोरोनल मास इजेक्शन आणि इतर सौर घटनांबद्दल समजून घेण्यास मदत करेल, असेही डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. आदित्य एल 1 मिशन हे केवळ स्वदेशीच नाही तर चांद्रयानाप्रमाणेच एक अतिशय किफायतशीर मिशन देखील आहे. या मिशनचा खर्च केवळ ६०० कोटी रुपये असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. देशात प्रतिभेची कधीच कमतरता नसली तरी त्या प्रतिभावंतासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचा आधीच्या काळातला निसटलेला दुवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जोडण्यात आला आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. आदित्य एल 1 अंतराळयान PSLV-P57 द्वारे 2 सप्टेंबर, २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. प्रभामंडल कक्षेत पोहोचण्यासाठी या यानाला सुमारे ११० दिवस लागले.