पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल विभागातील गट – क संवर्गातील तलाठी भरती २०२३ गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ५ जानेवारी रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करणेत आली आहे. त्यानुसार जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील (पेसा कायदा लागू) १७ संवर्गातील सरळसेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्र. Petition For Special Leave To Appeal (C) No. 22109/2023 मधील निर्णयास अधिन राहून अनुसूचित क्षेत्र (पेसा कायदा लागू) असणाऱ्या १३ जिल्हयामध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाचे मान्यतेने नंतर करणेत येईल.
उर्वरित २३ जिल्हयातील निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरु करणेत येत असल्याची माहिती प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा भूमि अभि लेख विभागाच्या अपर जमाबंदी आयुक्त, आणि अतिरिक्त संचालक सरिता नेरके यांनी दिली आहे.