नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोन विवाहीतांचा सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर दोन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. एक गुन्हा भद्रकाली तर दुसरा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. लग्नातील मानपानासह माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी हा छळ करण्यात आल्याचे तक्रारीत आहे.
पहिला प्रकार गडचिरोली जिह्यात घडला. याबाबत उपनगर पोलिस ठाणे हद्दीत राहणा-या विवाहीतेने तक्रार दाखल केली आहे. लग्नातील मानपान दिला नाही तसेच व्यवसायासाठी माहेरून दहा लाख रूपये आणावेत या मागणीसाठी एप्रिल २०२२ पासून सासरच्या मंडळीकडून विवाहीतेचा छळ केला जात आहे. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात पती प्रेमळ खेकारे व सासू सासरे (रा.आष्टी चामोर्शी, गडचिरोली) आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक बोडके करीत आहेत.
दुसरा गुन्हा भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत राहणा-या पीडित विवाहीने दिलेल्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आला आहे. लग्नात मानपान आणि हुंडा मिळाला नाही या कारणातून २०१८ पासून पुणे येथील सासरच्या मंडळीकडून मानसिक व शारिरीक छळ सुरू आहे. संशयिताकडून वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण होत असून सासरा आणि दिराने विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत पती कपील तांबे (रा.अतुरनगर उंडरी,पुणे) सह सासरच्या तेरा जणांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक देवरे करीत आहेत.