माणिकराव खुळे, हवामान तज्ञ
आजपासून पाच दिवस म्हणजे मंगळवार दि. १० जानेवारी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळलेले वातावरण राहून तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ गडगडाटीसह अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः खान्देश व लगतच्या नाशिक नगर छ.सं.नगर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापुर जिल्ह्यात मंगळवारी ९ तारखेला पावसाची ही शक्यता अधिक जाणवते. तर ह्या एके दिवशी केवळ ९ तारखेला पश्चिम मध्यप्रदेश उपविभागाबरोबरच महाराष्ट्रातील लगतच्या खान्देशातील शिरपूर शहादा चोपडा यावल रावेर तालुक्याच्या तुरळक भागात झालीच तर तुरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही.
अशी असेल थंडी
ढगाळ व पावसाळी वातावरण ओसंरल्यानंतर म्हणजे गुरुवार ११ जानेवारी, अमावस्येपासून, उत्तर भारतातून उत्तर व ईशान्य दिशेकडून थंड कोरडे वारे घुसण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात पुन्हा थंडीची शक्यता जाणवते. तो(६ ते १० जानेवारी)पर्यन्तच्या ५ दिवसात महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १६ डिग्री से.ग्रेड(म्हणजे सरासरीपेक्षा ४ डिग्रीने अधिक) व दुपारचे कमाल तापमान २८ डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरीइतके) दरम्यानचे असु शकते, असे वाटते.