शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आपले महाराष्ट्राचे नेते मिंधे झालेले आहेत, पैशांसाठी वेडे झाले आहेत…राज ठाकरे यांनी केला हल्लाबोल

जानेवारी 6, 2024 | 6:09 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
GDJg nRa0AAnO7q

कर्जत (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आपले महाराष्ट्राचे नेते मिंधे झालेले आहेत, पैशांसाठी वेडे झाले आहेत… त्यांना महाराष्ट्राचं सत्व कळत नाही. त्यांना पाठीचा मणका नाही. स्वतःची मनं आणि स्वाभिमान त्यांनी गहाण टाकलेला आहे अशा शब्दात मनसे नेते राज ठाकरे यांनी केले
ज्या निष्ठुरपणे देशातील राजकारण सुरु आहे, ज्याप्रकारे न्यायव्यवस्था सुरु आहे. त्यानुसार उद्या ते मुंबईला हात घालायला मागे-पुढे बघणार नाहीत. महाराष्ट्राचे तुकडे करायला, विदर्भ वेगळा करायला वेळ लावणार नाहीत. हे का होतंय? कारण मराठ्यांनी सव्वाशे वर्ष या देशावर राज्य केलंय, महाराष्ट्र स्वतंत्र मताचा प्रदेश आहे. हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय असेही ते म्हणाले.

सहकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले, सर्वांनी एकत्र येऊन सहकार सांभाळायचं याचा अर्थ म्हणजे आताचं सरकार नाही, बरं का. आताचं सरकार म्हणजे सहारा चळवळ. आम्ही अडकलोय आम्हाला सहारा द्या. महात्मा फुले ह्यांचं सहकार चळवळीतलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये म्हणून पहिलं आंदोलन केलं ते आमच्या महात्मा फुलेंनी केलं. देशात सर्वाधिक महाराष्ट्रात सव्वादोन लाखापेक्षा जास्त सहकारी संस्था आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं गुजरात राज्य… ज्या गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे. गुजरातची अमूल डेअरी आपल्या महाराष्ट्राच्या महानंदा डेअरीला गिळायला आवासून उभी आहे.

यावेळी त्यांनी साखर कारखाने हवेत म्हणून ज्या मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष आहे तिथे सर्वाधिक पाणी लागणारं उसाचं पीक घेतलं जातंय. त्यासाठी जमिनीतून अतोनात पाणी शोषलं जातंय. भूजल पातळी अशीच कमी होत गेली तर पुढच्या ४०-५० वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल आणि ती जमीन पुन्हा पुर्वव्रत करायला १५० वर्ष लागतील असा नॅशनल जिओग्राफिकचा अहवाल असल्याचेही सांगितले.

महाराष्ट्रात जाती-जातीत जो भेद निर्माण होतोय… हे एक षडयंत्र आहे. महाराष्ट्र एकसंध राहू नये, इथला मराठी माणूस एकत्र राहू नये… ह्यासाठी बाहेरच्या सूत्रधारांचे प्रयत्न सुरु आहेत पण हे आमच्या लोकांना समजत नाहीये. मी गेली अनेक वर्ष पोटतिडकीने हेच सांगतोय… कि महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते तिथून बाहेर काढा, महाराष्ट्रापासून वेगळं करा… तसं होत नसेल तर उध्वस्त करा. पण महाराष्ट्राला दुबळं करा…. असं एक कटकारस्थान सुरु आहे. कोणताही इतिहास भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही. जगातील जेवढी युद्ध झाली ती सर्व जमीन बळकावण्यासाठीच झाली आहेत. आपली जमीन हेच आपलं अस्तित्व आहे. माझी रायगडमधील मराठी बांधवांना हात जोडून विनंती आहे, शिवडी-न्हावाशेवा पूल पूर्ण होईल, उद्या इथे विमानतळ होईल तेव्हा रायगड जिल्ह्यातील जमिनी राखा, इथलं मराठी माणसाचं अस्तित्व जपा. नाहीतर भविष्यात पश्चातापाचा हात कपाळावर मारण्यापलीकडे काहीही उरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं आपला शत्रू समुद्रमार्गे येईल, समुद्रावर गस्त वाढवा. पण आम्ही बेसावध. महाराष्ट्रात आजपर्यंत झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी समुद्रमार्गेच आले आहेत. ३५० वर्षांपूर्वी महाराजांनी सांगूनही आमचे राज्यकर्ते त्यातून बोध घेत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आरमार उभं केलं. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजरा करायच्या पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या कोकण किनारपट्टीला राखायचं नाही… मग हिंदवी स्वराज्याकडून आपण काय प्रेरणा घेतली? असेही ते म्हणाले.

आपल्याकडे येणारे प्रकल्प हिसकावले जातात, हजारो एकर जमिनी गिळल्या जात आहेत, मराठी माणसाला आपापसात झुंजवलं जातंय… महाराष्ट्राच्या विरोधात अनेक महाराष्ट्र-द्वेष्ट्यांची मिळून अशीही एक सहकार चळवळ गेली ७० वर्ष सुरु आहे. यावेळी त्यांनी घरात बसून जे म्हणतात की मराठी माणसाला उद्योगधंदा जमत नाही त्यांना माझं एकंच सांगणं आहे कि, महाराष्ट्रात फिरा… तुम्हाला मराठी माणूस हजारो कोटींचे व्यवसाय यशस्वीपणे चालवताना दिसतील. जगप्रसिद्ध शनेल नावाच्या परफ्युमसाठीचा अर्क हे आपल्या महाराष्ट्रातून एक मराठी माणूस पुरवतो असेही राज ठाकरे म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरफोडीची मालिका सुरूच…चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सात लाखाचा ऐवज केला लंपास

Next Post

राज्यात या जिल्हयात पाच दिवस पाऊस व नंतर थंडीचे…हवामान तज्ञांचा अंदाज

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
Untitled 9

राज्यात या जिल्हयात पाच दिवस पाऊस व नंतर थंडीचे…हवामान तज्ञांचा अंदाज

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011