नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीत भरधाव दुचाकी घसरल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. किरण जनार्दन राऊत (रा.महाकाली चौक,अंबड लिंकरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राऊत शुक्रवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास औद्योगीक वसाहतीतून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. प्लॉट नं. बी २५ येथील आयबा इंटरप्राईजेस कारखान्यासमोरून तो जात असतांना भरधाव दुचाकी घसरली. या अपघातात दुचाकीवरून पडल्याने तो बेशुध्द पडला होता.
मित्र विशाल कारले याने त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार धनगर करीत आहेत.