नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहा कोटींचे कर्ज हळदीच्या प्रोजेक्टसाठी काढून देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील व्यावसायीकास एकाने तब्बल पंधरा लाखांना गंडा घातला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित पाटील असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी संजय सुभाष देशमुख (रा.पुर्णा नगर चिंचवड पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. देशमुख यांना हळद निर्मीतीचा व्यवसाय करायचा होता. त्यामुळे त्यांनी सन. २०२१ मध्ये संशयिताची भेट घेतली असता ही फसवणुक झाली. या व्यवसायाच्या प्रोजक्ट उभारणीसह बँकेकडून दहा कोटी रूपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले त्यामुळे देशमुख यांचा विश्वास बसला.
सन. २०२१ पासून संशयिताने महामार्गावरील हॉटेल तपोवन येथे देशमुख यांना बोलावून घेत लोन साठी लागणा-या प्रोसेसिंग फीस सह विविध कारणे सांगून तब्बल १५ लाख रूपयांच्या रकमा स्विकारल्या. मात्र तरीही कर्ज न मिळाल्याने देशमुख यांनी पैश्यांसाठी तगादा लावला असता संशयिताने टाळाटाळ केल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.