इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हयात सुरगाणा तालुक्यात एका बोगस डॅाक्टरांविरुध्द गुन्हा दाखल केल्याच्या घटनेनंतर धुळे जिल्ह्यातल्या ७ बोगस डॉक्टरांविरूद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना अॅलोपेथी औषध साठा बाळगल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर काल विविध गावांमध्ये छापा घालून पोलीसांनी अॅलोपॅथी औषधी साठा,इंजेक्शन्स,सलाईन आणि गोळ्या तसेच अन्य साहित्य ताब्यात घेतले.
या सर्व सात जणांविरुद्ध संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.