इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला १५ कोटीचा गंडा घातल्याचे वृत्त समोर आले आहे. व्यावसायातील त्याच्या जुन्या भागीदारांनीच ही फसवणूक केली आहे. अरका स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीने ही फसवणूक केली आहे. यात १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यानंतरच धोनीने रांचीतील न्यायालयात हा फौजदारी खटला दाखल केला आहे.
मिहीर दिवाकर आणि सौम्य विश्वाश ही फसवणूक करणा-यांची नावे समोर आली आहे. अरका स्पोर्ट्स ऍन्ड मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमध्ये धोनीने पैसे गुंतवले होते. दिवाकर आणि विश्वाश यांच्यानी धोनीसोबत जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी बनवण्यासाटी २०१७ साली हा करार केला होता. पण या दोघांकडून कराराच्या अटी पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे हा खटला दाखल केला आहे.
एमएस धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली. त्याचप्रमाणे त्याने जाहिरात क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पैसे जमवले. पण, त्याची फसवणूक कोणी केल्याचे आतापर्यंत समोर आले नाही. पण, आता त्याची थोडी थोडकी नाही तर १५ कोटीला गंडा घातला आहे. अनेकांचे बॅाल थेट टोलवणा-या धोनीला एका कंपनीने गंडा घातला आहे.