इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : नांदेड शासकीय रुग्णालयात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या रुग्णमृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. या संदर्भात चौकशीसाठी एक त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने रुग्णालयाला क्लिनचिट दिली आहे.
नांदेड येथे २४ तासात २४ मृत्यू झाल्याने शासकीय रुग्णालयातील दुरावस्था चव्हाट्यावर आल होती. दरम्यान सलग तीन दिवस मृत्यूचा आकडा वाढतच असल्याने रुग्णालय प्रशासन आणि सरकारवर टीकेची जोड उठली होती. या मृत्यू तांडवाचा तपास करण्यासाठी शासनाने तात्काळ स्त्री सदस्य समिती नियुक्त केली होती.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या डॉक्टरांचा समावेश होता. या समितीने नांदेड येथे येऊन चौकशी आणि तपासणी केली प्रत्येक मृत्यूची कारणे शोधून तसा अहवाल शासनाला पाठविला आहे. छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ञ डॉ. जोशी या तिघांचा समितीमध्ये समावेश आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या नवजात बालक आणि वृद्धांच्या मृत्यूला डॉक्टर अथवा रुग्णालय प्रशासन जबाबदार नसल्याचा अहवाल तपास समितीने दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता चौकशी समितीनेही डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाला क्लीनचिट दिली आहे.
औषधांचा तुटवडा नाही
वेळेपूर्वी जन्मल्याने आणि कमी वजन असल्यामुळे नवजात बालकांचा मृत्यू झाला. अत्यवस्थ रुग्णांनी उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कुठेही अत्यावश्यक औषधांचा तुटवडा आढळला नाही, असे समितीने स्पष्ट केले आहे