नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -निवडणुकीच्या तोंडावर पुढील पंधरा ते वीस दिवसात राज्यात एक नाहीतर अनेक राजकीय भूकंप होतील.. पुढे पहा काय होतंय ते असे सांगत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. यावेळी ते म्हणाले आघाडीवाले भानगडी आणि मारामाऱ्या करत आहे. निवडणूक पर्यंत काय होईल, ते बघावं लागेल. आघाडी तर बिघडली आहे. जनमत हे मोदींच्या मागे आहे.
महाजन हे नाशिकला २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या ‘शेकरू’ या शुभंकराचे, बोधचिन्हाचे आणि बोधवाक्याचे अनावरणासाठी आले होते. त्यावेळेस त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवार संवाद साधला. यावेळी त्यांनी सुरुवातीला पंतप्रधानाचा नाशिक दौरा व युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. त्यानंतर ते म्हणाले की,गोदा आरती आणि काळाराम मंदिर याबाबत अजून संमती नाही. प्रभू श्रीरामचंद्र आणि नाशिक यांचे अतूट नाते आहे. आमचा आग्रह आहे, की पंतप्रधान मोदी यांनी काळाराम मंदिरात यावे. पण सुरक्षेचा देखील प्रश्न आहे.
यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विषयावरील प्रश्नावर ते म्हणाले का काही लोकं असं करतात ? मायनॉरिटी लोकांना इतकं कुरवाळत बसायचं. मतांच्या राजकारणासाठी आहे. वेडा बनून पेडा खायचा असं सुरू आहे. मी तर म्हणतो आव्हाड यांची DNA तपासा उद्धव ठाकरे तुम्ही सहमत आहे का, तुमचं मत काय ? प्रभू श्रीरामचंद्र यांच्या विरोधात बोललं तर प्रसिद्धी मिळते, अशी काही लोकांची भावना असे सांगत त्यांनी या प्रश्नांवर परखड मत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी कांदा प्रश्न, मराठा आरक्षण, आ.रोहित पवार यांच्यावर पडलेली ईडीची धाड यासह विविध प्रश्नांना उत्तर दिले.