नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पोलिसांनी विविध गुन्ह्यातील हस्तगत केलेला ३ कोटी ६६ लाख ७० हजार ६९७ रुपयाचा मुद्देमाल न्यायालयाचे आदेशाने पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या हस्ते आज समारंभपूर्वक रेझिंग डे च्या दिवशी परत करण्यात आला.
पोलिस मुख्यालयातील भिष्मराज सभागृहात हा सोहळा पार पडला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदशार्खाली सर्व पोलिस ठाण्यांसह शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक व दोनच्या पथकांनी काही गुन्हे उघडकीस आणले. या मध्ये आरोपींकडून गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वेगवेगळ्या कारवाईत ३५ लाख ७१ हजार ९९७ किंमतीचे सोना-चांदीचे दागिने, पंधरा लाख ९५ हजार किंमतीच्या दुचाकी, अठ्ठावन्न लाख पाच हजार रूपये किंमतीच्या चारचाकी, तीन लाख ६७ हजार ५०० रूपये किंमतीचे मोबाईल तसेच दोन कोटी ५३ लाख ३१ हजार २०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. वरिल मुद्देमाल शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशान्वये व सीआरपीसी १०२ (३) अन्वये रेझिंग डे च्या निमित्त तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमाचे वेळी उपस्थिती फिर्यादी पैकी फिर्यादी सौ. दर्शना अढावु, सौ. स्नेहल येलमल्ले, मंगेश काजे, सुनिल यादव, नितीन गवांदे, बापु सुर्यवंशी, कैलास वाघ, पवण शर्मा, अशांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून पोलीस खात्या विषयी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
सदर कार्यक्रमास संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, उपायुक्त प्रशांत बच्छाव,किरण कुमार चव्हाण,मोनिका राऊत चंद्रकांत खांडवी तसेच सहाय्यक आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पोलिसांकडून आत्ता पर्यंत आठ वेळा मुद्देमाल परत करण्यात आला त्यामुळे मुद्देमाल वाटपाचा आकडा नऊ कोटी चौदा लाख एक हजार ३९९ रूपयांवर पोहचला आहे. रुपये किंमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला. या कार्यक्रमास सर्व पोलिस ठाण्यांचे व शाखांचे प्रभारी, मुद्देमाल कारकुन,पोलिस अंमलदार आणि फिर्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.