इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयावर सहा ठिकाणी छापे टाकले आहे. बारामती अँग्रोचे पुणे आणि बारामती येथील कार्यालयावर ईडीकडून ही छापेमारी सुरु आहे. राष्ट्रवादीतून फुट पडल्यानंतर रोहित पवार हे आक्रमक झाले. त्यानंतर त्यांना सत्ताधारीकडून वेगवेगळ्या प्रकरणात त्रास सुरु झाल्याचे बोलले जात आहे.
ही छापेमारी पूर्णपणे राजकीय असल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटही आक्रमक झाला आहे. आता या कारवाईवर ते काय प्रतिक्रिया देतात हे महत्त्वाचे आहे.माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कन्नड सहकारी कारखान्याबाबत ईडीकडे तक्रार केली होती. हा कारखाना रोहित पवार यांच्या बारामती अँग्रो कंपनीने केवळ ५० कोटी रुपयात लिलावत खरेदी केला असून लिलाव प्रक्रियेत मॅन्युप्युलेशन झाल्याचा दावा होता. त्यानंतर ही छापेमारी झाल्याचे बोलले जात आहे.
या धाडीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ED ची धाड पडल्याची बातमी समजली. पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याची हे त्याचं फळ आहे. वाईट याचेच वाटते की,यात आपलेच “घरभेदी” सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की, रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडेल.