इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिल बनवण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. असाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरुणी प्लॅटफॅार्मवर डान्स करते. पण, हा डान्स करतांना तीचा धक्का एका प्रवाशाला लागतो. त्यामुळे तो ज्या पध्दतीने रिअॅक्ट होतो. ते बघणे रिल बनवणा-यांनी बघणे खूप गरजेचे आहे. त्यात त्याने अशी अद्दल घडवली की तरुणीची सर्व हौसच निघून गेली.
खरं तर त्याची ही कृती एकदम नॅचरल आहे. त्यामुळे त्याची नेटक-यांनी प्रशंसा केली तर काहींनी टीकाही. पण, हा व्हिडिओ थोडा बोलका आहे. आता रिल काढण्याच्या पध्दतीमुळे दुस-यांना काय त्रास होईल याचा विचार केला जात नाही. तर काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे हे कळत नाही.
ही तरुणी जेव्हा प्लॅटफॅार्मवर डान्स करायला सुरुवात करते तेव्हा तीचा धक्का ज्या प्रवाशाला बसतो. तो थेट तिच्या कानामागे वाजवतो. त्यामुळे काहींनी वाह भाई वाह.. अशी दाद या व्हिडिओला दिली आहे. खरं तर तरुणीवर असे हात उठवणे गैर असले तरी तीची कृती सुध्दा समर्थनीय नाही. त्यामुळे या व्हिडिओवर दुहेरी प्रतिक्रिया आहे.