बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुंबईत देशातील पहिल्या सर्वात मोठ्या रत्ने आणि आभूषण व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन…

by Gautam Sancheti
जानेवारी 5, 2024 | 12:48 am
in राज्य
0
WhatsAppImage2024 01 04at6.25.07PMNG7U e1704395920732

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या वैविध्यपूर्ण घटक आणि सामग्रीचा समावेश असलेल्या समग्र परिसंस्थेसह भारत, रत्ने आणि आभूषण उद्योगाचे जागतिक केंद्र बनू शकतो, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते नव्या वर्षातील पहिल्या आणि भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या रत्ने आणि आभूषण व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुंबईत झाले, त्यावेळी ते बोलत होते. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री आणि उपकरणांसह नवी मुंबईमधील २० एकर क्षेत्रावर इंडिया ज्वेलरी पार्क आणि सीप्झ, मुंबईतील सामाईक सुविधा केंद्र यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, असेही केंद्रीय मंत्री गोयल यांनी यावेळी सांगितले.

पायाभूत सुविधांना चालना दिल्यामुळे, रत्ने आणि आभूषण क्षेत्रात, अतिशय आधुनिक आणि कार्यक्षम वातावरणात जागतिक स्पर्धात्मकता निर्माण करण्यासाठी आणि आपल्या व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी एमएसएमईंचे सक्षमीकरण होणार आहे, असे ते म्हणाले. दुबईत भारत-यूएई सीईपीएच्या यशानंतर आम्ही विविध देशांमध्ये विस्तारलेल्या जागतिक बाजारपेठेत आमचा प्रवेश करण्यासाठी हाँगकाँगमध्ये नवी निर्यात प्रोत्साहन परिषद सुरू करण्याच्या विचारात आहोत, असेही त्यांनी नमूद केले. ज्वेलरी डिझाईन हे आमचे यापुढील मोठ्या निर्यातीचे क्षेत्र असेल, असे सांगत गोयल म्हणाले की फॅशन आणि ज्वेलरीसाठी आगामी काळात भारत हे संपूर्ण जगाचे आकर्षण केंद्र राहील. भारताला फॅशन आणि आभूषणांच्या विश्वातील वैविध्यपूर्ण रचनांचे जागतिक केंद्र बनवण्यावर भर असला पाहिजे. फॅशन आणि आभूषणे यांच्या संचामुळे भारत जगासाठी एक मान्यताप्राप्त आणि पसंतीचे विवाह पर्यटन स्थळ बनू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयआयजेएस सिग्नेचर २०२४ च्या उद्घाटना दरम्यान, सॉलिटेयर इंटरनॅशनलच्या आयआयजेएस सिग्नेचर विशेष आवृत्तीचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी आज इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रधान उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे (आयएएस), जॉय अलुकासचे अध्यक्ष जॉय अलुकास, जीजेईपीसीचे उपाध्यक्ष किरीट भन्साली, जीजेईपीसीच्या राष्ट्रीय प्रदर्शनाचे निमंत्रक नीरव भन्साली आणि जीजेईपीसी सीओएचे सहकारी, सव्यसाची रे(ईडी, जीजेईपीसी), सरकारी अधिकारी, मान्यवर, अभ्यागत, प्रदर्शक, खरेदीदार, व्यापार प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रत्ने आणि आभूषणे निर्यात परिषद (GJEPC) या देशातील व सर्वात मोठ्या व्यापार मंडळाकडून आयआयजेएस सिग्नेचर जेम अँड ज्वेलरी व्यापार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जीजेईपीसीच्या १६ व्या आयआयजेएस सिग्नेचरमध्ये ६० देश आणि ८०० भारतीय शहरांमधून आंतरराष्ट्रीय ग्राहकांसह ३२ हजारपेक्षा जास्त अभ्यागत सहभागी होतील आणि ते १.२५ लाख चौरस मीटर प्रदर्शन क्षेत्रात असलेल्या ३०००+स्टॉल्सवरील १५००+ प्रदर्शकांची भेट घेतील अशी अपेक्षा आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयआयटी मुंबईच्या इतक्या विद्यार्थ्यांना मिळाले वार्षिक १ कोटी रुपयांपॆक्षा अधिक वेतनाच्या नोकरीचे प्रस्ताव

Next Post

राज्यातील विकासप्रकल्पांचा बैठकीत उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा…नाशिकच्या या कामांचाही समावेश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

court 1
संमिश्र वार्ता

गोदावरी नदीच्या पुनर्जीवन याचिकेत अवमान याचिका…दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश

ऑगस्ट 27, 2025
Untitled 45
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उध्दव ठाकरे…सहकुटुंब घेतले गणपतीचे दर्शन

ऑगस्ट 27, 2025
भूमित्र या चॅटबॉट सेवेचे उद्घाटन 3
संमिश्र वार्ता

महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची केली सुरुवात

ऑगस्ट 27, 2025
Milind Kadam M4B
संमिश्र वार्ता

मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूक सेवा…इतक्या तासाचा असेल प्रवास

ऑगस्ट 27, 2025
Sadan Ganesh 1 11 913x420 1
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष; आज ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
ajit pawar e1706197298508 1024x770 1
महत्त्वाच्या बातम्या

लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी….उपमुख्यमंत्री अजित पवार

ऑगस्ट 27, 2025
ganeshotsav 1 e1738348574343
मुख्य बातमी

यंदा बाप्पा वाजत गाजत येणार… अशी करा श्रीगणेशाची स्थापना… असा आहे मुहूर्त…

ऑगस्ट 27, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना जुने मित्र भेटेल, जाणून घ्या, बुधवार, २७ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 26, 2025
Next Post
unnamed 2024 01 05T010402.674 e1704396965400

राज्यातील विकासप्रकल्पांचा बैठकीत उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा…नाशिकच्या या कामांचाही समावेश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011