बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या ठिकाणी बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल…इतकी औषधे केली जप्त

by India Darpan
जानेवारी 4, 2024 | 8:20 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240104 WA0375 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –सुरगाणा येथे बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करुन त्याच्याकडून १८ प्रकारचे ११ हजार ५३४ रुपये किमतीची वैद्यकीय औषधे जप्त करण्यात आले. या बोगस डॅाक्टराकडे कुठेलही वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांना अॅलोपॅथी औषधांच्या आधारे प्रॅक्टिस करत असल्याने चौकशीत निष्पन्न झाले. सदर बोगस डॉक्टरवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे ३३, ३४ व ३६ प्रमाणे बाऱ्हे पोलिस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास हा बाऱ्हे पोलिसांकडून करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना सुरगाणा येथील ग्रामपंचायत बाऱ्हे येथे एक व्यक्ती कुठलीही वैद्यकीय पदवी नसतांना डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांना सदर प्रकरणी शहानिशा करून कारवाई करावी असे निर्देश दिले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांना सुरगाणा येथील प्रकाराबाबत चौकशी पथक पाठवण्याचे सूचना केल्या.

यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर यांच्यासमवेत डॉ. देवानंद चौधरी, डॉ. अक्षय पाटील, औषध निर्माण अधिकारी तुषार चौधरी, आरोग्य सेवक कपिल जाधव यांच्या चौकशी पथकाने पंच यांच्या समवेत आमदा बाऱ्हे फाटा येथे रोड लगत पत्र्याच्या शेड मध्ये एक इसम हा खुर्चीवर बसलेला दिसला. त्याची चौकशी केली असता सदर इसमाने स्वतःचे नाव दीपक ज्योतीन ओझा वय ३८ वर्षे असे सांगितले, सदर इसम तो पश्चिम बंगाल येथील फूलतला तालुका जिल्हा चोवीस परगाना येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडे कोणतीही परवाणगी नसल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुठलीही वैद्यकीय पदवी नसतांना प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोर यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठी विद्यापीठ येत्या जूनपासून सुरु होणार…थीम पार्क बरोबरच हे असेल अभ्यासक्रम

Next Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या या परिक्षेचा निकाल जाहीर…

India Darpan

Next Post
mpsc11

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या या परिक्षेचा निकाल जाहीर…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011