मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वत्र त्याचे पडसाद उमटले आहे. मनमाड येथे शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध करण्यात आला.
यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते म्हणाले की, सकल हिंदू समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांच्या विषयी आक्षेपार्ह, वादग्रस्त वक्तव्य करत, राजकीय स्वार्थासाठी व समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जितेंद्र आव्हाडचे वक्तव्य आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध मनमाड शहर शिवसेनेतर्फे करत आहोत.
अखंड हिंदुस्थानाचे कोट्यावधी हिंदू समाजाचे दैवत प्रभू श्रीरामांचे येणाऱ्या २२ जानेवारीला अयोध्या येथील श्रीराम मंदिर सोहळ्यानिमित्त आनंदाचे वातावरण असतांना महाविकास आघाडीचा गरळ ओकणारा मुब्राचा जितेंद्र आव्हाड याने प्रभू श्रीरामान बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल मनमाड शहर शिवसेना व तमाम श्रीराम भक्त यांच्या वतीने प्रतीकात्मक पुतळा जाळत आज आम्ही जाहीर निषेध केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.