मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्यांपैकी एक, आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्याच चर्चेत आल्या होत्या.
रश्मी शुक्ला यांना ६ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. मात्र, त्यानंतर राज्य सरकार त्यांना मुदतवाढ देऊ शकते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार २९ डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यामध्ये सर्वात आधी नाव रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निर्णय घेत त्यांची नियुक्ती केली.
महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून रश्मी शुक्ला यांच्या नियुक्ती बाबत चर्चा होती. सत्तांतरानंतर रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर ही नियुक्ती झाली.