रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये सुविचार गौरव पुरस्कार सोहळा संपन्न…यांचा झाला सन्मान

by India Darpan
जानेवारी 4, 2024 | 6:40 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240104 WA0327 e1704373808394

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सुविचार मंच आयोजित चौथा सुविचार गौरव पुरस्कार सोहळा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडला.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आ.दिलीप बनकर,आ.दिलिप बोरसे,मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍड.नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षीरसागर,विष्णुपंत म्हैसधुणे,लक्ष्मण सावजी, राजेंद्र डोखळे,युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,डॉ.स्वप्नील तोरणे, प्रा . विनोद गोरवाडकर,प्रा.डॉ.प्रशांत सूर्यवंशी,सुविचार मंचचे ऍड.रवींद्र पगार आणि आकाश पगार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, समाजात चांगल्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे या उद्देशाने अनेक संस्था काम करतात. त्यादृष्टीने नाशिकमध्ये सुविचार मंच ही संस्था काम करते या सुविचार मंचच कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन संस्था काम करते आहे. त्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जगात आणि देशात अविचाराचे वातावरण असताना सुविचार गौरव काम करतय याचा विशेष आनंद आहे. विशेष म्हणजे आकाश पगार आणि त्यांच्या युवकांची टीम नाशिकच्या गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी काम करताय त्यांचं हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. तसेच नाशिकचे नाशिकपण टिकविण्यासाठी अनेक संस्था नाशिकमध्ये काम करताय त्यांचं सर्वांचे अभिनंदन करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आपलं काम करतांना नाउमेद न होता सकारात्मकतेने काम करत राहणं आवश्यक आहे. समाजातील कर्तृत्ववान लोकांना समाजासमोर आणून त्यांचा सन्मान करण्याचं काम संस्थेच्या वतीने करण्यात आल आहे. या पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना काम करण्यास अधिक स्पूर्ती मिळत असते. त्यातून समाजाच्या विकासासाठी मोठी मदत मिळते. तसेच आपल्या अंगात कला गुण असतील तर त्याला हेरनारे लोक समाजात असतात. त्यातून अनेकांना मोठी संधी मिळते असे त्यांनी सांगितले. या सोहळ्यास नाशिकच्या स्थानिक कलाकारांनी मराठी, हिंदी गाण्यांवर विविध सामूहिक नृत्य व गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

सुविचार गौरव पुरस्काराने यांचा झाला सन्मान
पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर (जीवन गौरव)
अभिनेते गौरव चोपडा (कला)
अभिनेत्री सौ.अक्षया देवधर व अभिनेते हार्दिक जोशी (विशेष पुरस्कार)
श्री.रामचंद्रबापू पाटील (सामाजिक)
डॉ.भाऊसाहेब मोरे (वैद्यकीय)
डॉ. शेफालीताई भुजबळ (शैक्षणिक)
श्री. दत्ता पाटील (साहित्य)
श्री.चंद्रशेखर सिंग (उद्योग)
श्रीमती संगीताताई बोरस्ते (कृषी)
प्रा.नानासाहेब दाते (सहकार)
कु.गौरी घाटोळ (क्रीडा)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकरोड -शिर्डी प्रस्तावित लोहमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम रद्द करा…खा. गोडसे यांच्याकडे शेतक-यांनी या कारणाने केली मागणी

Next Post

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती…या प्रकरणामुळे आल्या होत्या चर्चेत

Next Post
Untitled 32

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती…या प्रकरणामुळे आल्या होत्या चर्चेत

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011