इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रशिया-युक्रेन नंतर आणखी दोन देश एकमेकांशी भिडले आहेत. हमासने इस्त्रायलमध्ये सुरू केलेल्या युद्धसदृष्य कारवायांविरुद्ध अमेरिकेने कंबर कसली आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्त्रायलला पाठींबा दिला आहे. इस्त्रायलसोबत आपण उभे राहणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
हमासने इस्रायलवर सुमारे ५००० हून अधिक एवढ्या प्रचंड संख्येने रॉकेट हल्ला केला आहे. तसेच इस्रायलचे ३५ हून अधिक नागरिकांचे अपहरण केले आहे. सोशल मीडियावर अनेक लोक जखमी झाल्याचे आणि मृत झाल्याचे फोटो व्हिडीओ अपलोड होऊ लागले आहेत.
रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर हमासचे घुसखोर बेछूट गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. हे पाहून अमेरिकेने पाठींबा देण्याची मोठी घोषणा केली आहे. हमासच्या या हल्ल्याविरोधात इस्रायलने ‘ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स’ ची घोषणा केली आहे. हमासने गंभीर चूक केल्याचे इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. दक्षिण इस्रायलमध्ये २१ ठिकाणी हमास घुसखोरांनी हल्ले केले आहेत. या सर्व घडामोडी पाहून अमेरिकेने आपण इस्रायलसोबत उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहे. इस्रायलमधील हमास हल्ल्याचे जे फोटो, व्हिडीओ येत आहेत. यामध्ये मृत आणि जखमी झालेल्या लोकांना पाहून विचलित व्हायला होत आहे. या घटनेत आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत, असे स्पष्ट केले आहे.
पाच इस्रायली आयडीएफ सैनिकांचे अपहरण
रॉकेट हल्ल्यादरम्यान, त्यांनी पाच इस्रायली आयडीएफ सैनिकांचे अपहरण देखील केले आहे. अलीकडेच गाझा आणि इस्रायलमधील अस्थिर सीमेवर अनेक आठवडे तणावाचे वातावरण असताना पॅलेस्टिनी दहशतवाद्यांकडून इस्त्रायलवर हे रॉकेट डागण्यात आले आहे.
After Russia-Ukraine, now these two countries clashed…