इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी विमानामध्ये एका प्रवाशांनी लघुशंका केल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली होती, मात्र रेल्वेमध्ये देखील असाच प्रकार घडल्याने याकडे मात्र रेल्वे प्रशासन दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे एका मद्यधुंद प्रवाशाने चक्क वैज्ञानिक दांपत्यासोबत हा गैरप्रकार केला असून याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे, तसेच त्या मद्यपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील होत आहे. मात्र त्या मद्यपीवर कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आले आहे, त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. जी. एन. खरे यांच्या आणि त्यांची पत्नी ऊषा खरे यांच्यासोबत त्यांच्या सीटच्या शेजारी बसून दिल्लीचा राहणारा रितेश हा प्रवास करत होता. त्याने प्रवासात दारुही प्राशन केली. याबाबत डॉ. खरे यांनी त्या मद्यपी या बद्दल विचारणा असता त्याने त्यांना धुडकावून लावले. या वादातून त्याने डॉ. खरे व त्यांच्या पत्नीवर लघुशंका केली. एका मान्यवर पती-पत्नी सोबत असाच गैरप्रकार घडला असताना रेल्वे प्रशासनाने त्यामध्ये कोणतीही कारवाई केली नाही, याबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त होत आहे.
रेल्वेने तरुणाला सोडून दिले, दाम्पत्य नाराज
वाराणसी हिंदू विद्यापीठातून निवृत्त झालेले वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. जी. एन. खरे यांच्या आणि त्यांची पत्नी ऊषा खरे यांच्यासोबत मध्यप्रदेशमध्ये झाशीजवळ संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे रेल्वेने तरुणाला सोडून दिले; वैज्ञानिक दाम्पत्य नाराज झाले आहे.
विमानात महिलेवर लघुशंका करणा-यावर केली होती कारवाई
न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एका विमानात मद्यधुंद अवस्थेत महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. शंकर मिश्राचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली होती. त्याचे शेवटचे लोकेशन बंगळुरूमध्ये सापडले होते, अखेर त्याला अटक करण्यात बंगळुरू पोलिसांना यश आले आहे. गेल्या काही काळापासून असे प्रकार विमानांमध्ये घडत आहेत. परंतू, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. मात्र