नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिवाळ्यामधील धुक्याच्या वातावरणामुळे दर वर्षी विशेषतः देशाच्या उत्तरेकडेच्या भागातील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. धुक्याच्या हवामानात रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी, भारतीय रेल्वेने १९,७४२ फॉग पास डिव्हाइस, अर्थात धुके भेदून जाणाऱ्या उपकरणांची तरतूद केली आहे. हा उपक्रम रेल्वे सेवेची विश्वासार्हता वाढवण्याच्या, विलंब कमी करण्याच्या आणि प्रवाशांची एकूण सुरक्षितता वाढवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.
फॉग पास डिव्हाइस हे एक जीपीएस आधारित दिशादर्शक उपकरण आहे, जे लोको पायलटला (चालक) दाट धुक्याच्या परिस्थितीत मार्ग शोधायला मदत करते. हे उपकरण हे लोको पायलट्सना, सिग्नल, लेव्हल क्रॉसिंग गेट (मानव आणि मानवरहित), कायमस्वरूपी वेग प्रतिबंधक, तटस्थ विभाग, ई. यासारख्या स्थिर खुणांच्या स्थळांची प्रत्यक्ष अद्ययावात माहिती (दृश्य आणि ध्वनीच्या स्वरूपातील मार्गदर्शन) प्रदान करते. हे उपकरण, व्हॉईस मेसेजसह भौगोलिक क्रमाने, अंदाजे ५०० मीटर अंतरावर समोर येणाऱ्या पुढील तीन निश्चित लँडमार्क्सची (स्थिर खुणांची) आगाऊ सूचना देते.
फॉग पास डिव्हाइसची सामान्य वैशिष्ट्ये:
- सिंगल लाईन, डबल लाईन, इलेक्ट्रीफाईड तसेच नॉन इलेक्ट्रीफाईड विभाग, यासारख्या सर्व प्रकारच्या विभागांसाठी योग्य.
- सर्व प्रकारच्या वीज आणि डिझेल वरील इमू/मेमू.डेमू गाड्यांसाठी योग्य.
- 160 KMPH पर्यंत गाडीच्या वेगासाठी योग्य.
- 18 तास चालणार्या अंतर्भूत री-चार्जेबल बॅटरीची सुविधा.
- पोर्टेबल (हलवता येण्याजोगे), आकाराने कॉम्पॅक्ट (लहान), वजनाने हलके (बॅटरीसह 1.5 की. पेक्षा जास्त नाही) आणि मजबूत डिझाइन.
- लोको पायलटना आपली ड्युटी सुरू होताना रेल्वे गाडीत हे उपकरण सहज नेता येते.
- लोकोमोटिव्ह च्या कॅब डेस्कवर सहजपणे ठेवता येते.
- ही एक स्वतंत्र प्रणाली आहे.
- धुके, पाऊस किंवा सूर्यप्रकाश यांसारख्या हवामानाच्या परिस्थितीमुळे ते प्रभावित होत नाही.









