नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात असून वेगवेगळया भागातून नुकत्याच चार मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. त्यातील तीन दुचाकी गोदाघाटावरील कपालेश्वर मंदिर परिसरातून चोरीस गेल्या असून याप्रकरणी पंचवटी व उपनगर पोलिस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना नाशिक पुणे रोडवरील सिध्दार्थ हॉटेल भागात घडली. गजानन नाना सर्के (रा.गोदावरी हेरिटेज जवळ,गायत्रीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सर्के यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एचबी ५५९१ चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. अॅक्टीव्हा दुचाकी घरासमोर पार्क केलेली होती. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.
दुस-या घटनेत औद्योगीक वसाहतीतील समाधान भालेराव देसले (रा.विश्वासनगर,अशोकनगर) हे सोमवारी (दि.१) गोदाघाटावर गेले होते. कपालेश्वर मंदिर परिसरात त्यांनी आपली एमएच १५ जीझेड ९३६३ दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी पळववून नेली. तिसरी घटना याच भागात गेल्या २५ डिसेंबर रोजी घडली. जयप्रकाश रघुनाथ देशमुख (रा.खांदवे नगर,पाईपलाईन रोड,गंगापूर) हे रामकुंड भागात गेले असता कपालेश्वर मंदिरासमोर पार्क केलेली त्यांची पॅशन एमएच १५ एझेड ७७९० दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली.
चौथी घटना सोमवारी (दि.१) घडली. चेतन मिलींद बाविस्कर (२५ रा.पाथर्डी फाटा)हा तरूण सोमवारी गोदाघाटावर गेला असता कपालेश्वर मंदिरासमोरील पार्किंगमध्ये लावलेली त्याची स्प्लेंडर एमएच १९ सीबी ७९१० चोरट्यांनी पळवून नेली. तिन्ही घटनांबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार शेळके,शेवाळे व वाडेकर करीत आहेत.