नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम लल्ला यांच्या स्वागताप्रित्यर्थ स्वाती मिश्रा यांनी गायलेले भक्तीमय भजन सामायिक केले आहे. हे भजन मंत्रमुग्ध करणारे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले; “श्री राम लल्ला यांच्या स्वागताप्रित्यर्थ स्वाती मिश्रा यांनी सादर केलेले भजन मंत्रमुग्ध करणारे आहे…..
स्वाती मिश्रा या बिहारमधील छपरा जिल्ह्यातील माला गाव येथील राहणा-या आहेत. पण, आता त्या मुंबईत राहतात.
स्वाती मिश्रा या भोजपुरी गाणे व भजन ब-याच दिवसांपासून गात आहे. पण, त्यांचे रामभक्तीवरील हे भजन खूप लोकप्रिय झाले आहे. त्यांनी सोशल मीडियावर सुध्दा हे भजन पोस्ट केले. त्यानंतर ४५ मिलियन व्यूज मिळाले आहे. याअगोदर त्यांनी ओम जय अंबे गौरी, जय गणेश देवा हे भजन गायले आहे.