इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात पतीने पत्नीला एका लॅाजवर प्रियकरासोबत रंगेहात पकडल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीचे अफेअर सुरु असल्याची कुणकुण पतीला होती. त्यानंतर पत्नीचा पाठलाग करत हा भंडाफोड पतीनेच केला. याप्रकरणी पतीने वाकड पोलिस ठाण्यात पत्नी विरोधात तक्रारही दाखल केली आहे.
दुपारी ३ च्या दरम्यान पती आपल्या सहका-याबरोबर लॅाजवर गेला. ज्या रुममध्ये पत्नी प्रियकराबरोबर होती. त्या रुमजवळ गेला. त्यानंतर त्याने दरवाजा तोडला. यावेळी पत्नी निर्वस्त्र व शारीरिक संबध ठेवत असल्याचे पतीने तक्रारीत म्हटले आहे.
गेल्या काही वर्षात विवाहबाह्य संबध असण्याचे प्रकार वाढले आहे. त्यात सोशल मीडियाने त्यात भर घातली आहे. थेट संपर्क होत असल्यामुळे सहज एकमेकांच्या जवळ येतात व त्यातून संसारही उदध्वस्त होते. खरं तर पती व पत्नी यांचे नाते विश्वासाचे असते. पण, त्यात तिसरा आला की या नात्यात वितुष्ट येते. वाकडमध्ये असाच प्रकार घडला असून आता प्रकरण थेट पोलिस स्थानकात गेले आहे.