जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिम यांनी पाच लाखाचे खैर ताकडाची तस्करी पकडली. शासकीय वाहनाने अधिकारी नायगाव किनगाव रस्त्यावर गस्त करीत असताना ही तस्करी त्यांनी पकडली. किनगावकडे जात असतांना बोलेरो पीक अप MH04 GR 4353 संदिग्ध वाहन भरधाव वेगाने जात असता त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, वाहन चालक वाहन सोडून अंधारात फ़रार झाला. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर प्रजातीचे लाकूड मिळून आले. वाहन जप्त करून शासकीय विक्री आगार यावल येथे आणून जमा करण्यात आले आहे.
जप्त माल महिंद्रा बोलेरो पिकअप व त्यात असलेले खैर जातीचे लाकूड अंदाजे 5.000 घन मीटर वाहन तसेच मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत ५ लाख रुपये एवढी आहे. सदर कार्यवाहीत आर. बी. थोरात वनपाल गस्ती पथक, विपुल पाटील वनपाल वाघझिरा, अक्षय रोकडे वनरक्षक निंबादेवी, चेतन शेलार वनरक्षक मनूदेवी, योगिराज तेली वाहन चालक तसेच सचिन तडवी पोलिस कांस्टेबल यांनी सहभाग घेतला.
सदर कार्यवाही ही हृषिकेश रंजन वनसंरक्षक धुळे, जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव, म. आर आर सदगीर विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे, प्रथमेश हडपे सहाय्यक वन संरक्षक यावल, अजय बावणे वनक्षेत्रपाल गस्ती पथक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .