नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिट अँड रन कायद्यामुळे देशभरातील टँकर आणि ट्रक चालकांच्या संघटनांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत केंद्र सरकार आणि ट्रक चालकांच्या संघटनांशी सकारात्मक चर्चा झाल्याने देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
या संपात टँकर चालकही सामील झाले होते. त्यामुळे त्याचा फटका तत्काळ बसला. आज दिवसभर अनेक पेट्रोलपंप ड्राय झाले होते. तर अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. हा संप जर सुरु असता तर त्याचे परिणाम जीवनावश्यक वस्तूवर झाले असते. इतकेच नाही तर स्कुल बसपासून इतर वाहनेही इंधनामुळे बंद पडली असती. त्यामुळे देभभर या संपाची चर्चा होती. पण, सकारत्मक निर्णय झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने हिट अँड रनचा कायदा लागू झालेला नाही. ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचे आवाहन केले त्यानंतर सरकारसोबतच्या बैठकीनंतर हा संप ट्रान्सपोर्ट संघटनांनी मागे घेतला. ट्रकचालकाने एखाद्याला धडक दिल्यास नव्या कायद्यात १० वर्ष कैद आणि ७ लाखांचा दंड केला आहे. त्यामुळे वाहनचालकाचा त्याला विरोध आहे.