नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत प्रतिवर्षी ३ जानेवारी रोजी महिला शिक्षिकांना थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येते सन २०२४ करिता गटस्तरावरुन एकुण २६ प्रस्ताव प्राप्त झाले होते सदर प्रस्तावांची गटशिक्षणाधिकारी यांचेमार्फत गट बदल करुन पडताळणी करण्यात येवुन गुणाकन करण्यात आले. शिक्षिकांचे वर्गस्तरीय कामकाज, विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्ता वाढ, सहशालेय उपक्रम इत्यादीचे अवलोकन करण्यात आले.
पुरस्कारासाठी आवश्यक असलेल्या किमान अटी व शर्ती तथा निकष पूर्ण केलेल्या शिक्षिकांची प्रत्येक गटातून एक या प्रमाणे एकुण १५ नावे अंतिम करण्यात आली. सदर शिक्षिकांची सन २०२४ च्या थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पुरस्कारार्थी शिक्षिकांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिनंदन केले, पुरस्कार प्राप्त शिक्षिकांचा पुरस्कार वितरण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ नितीन बच्छाव यांनी दिली.
असे आहेत पुरस्कारार्थी –
बागलाण – मीनाक्षी आप्पाजी भामरे, जि.प. शाळा अंबासन
चांदवड – सविता ठाणसिंग दातरे, जि.प. शाळा बोराळे
देवळा – संगिता नामदेव कापडणीस, जि.प. शाळा वासोळपाडा
दिंडोरी – योगिता दादाजी मोरे, जि.प. शाळा म्हेळूस्के
इगतपुरी – मंगला रुपाजी शार्दुल, जि.प. शाळा टिटोली
कळवण – जानकाबाई दादाजी बागुल, जि.प. शाळा कळवण मुली
मालेगाव – भारती धर्मा जाधव, जि.प. शाळा टाकळी
नाशिक – शितल सेनाजी पगार, जि.प. शाळा मातोरी
नांदगाव – भारती सुदाम सूर्यवंशी, जि.प. शाळा जातेगाव
निफाड – शितल नागोराव बावणे, जि.प. शाळा कोकणगाव
पेठ – मंदाकिनी हरिदास शेलार, जि.प. शाळा वांगणी
सिन्नर – रविता अरुण भोईर, जि.प. शाळा कहांडळवाडी
सुरगाणा – गौरी राजेंद्र गायवन, जि.प. शाळा गाळपाडा
येवला – मनिषा अशोक वाकचौरे, जि.प. शाळा आडवाट, जळगाव नेऊर
त्र्यंबकेश्वर – सुरेखा तुकाराम साबळे, जि.प. शाळा नांदुरकीपाडा