नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाच्या ऐवज चोरुन नेला. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे लंपास केले. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकुमार बालेश्वर पांडे (रा.गुरूदत्त रो हाऊस,रामेश्वर कॉलनी कडेपठार चौक श्रमिकनगर) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. पांडे कुटूंबिय शुक्रवारी (दि.२९) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख १२ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत.