नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एमआयडीसी चुंचाळे पोलीसांची नव वर्षात दमदार कामगिरी केली आहे. सिमेन्स कंपनीत एक वर्षापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावत ३९ लाख २५ हजाराचा मुद्देमाल केला हस्तगत केला आहे.
एमआयडीसी अंबड मधील सिमेन्स कंपनीत एक वर्षापूर्वी चोरी झाली होती. त्याबाबत अंबड पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा वर्षभरापासून तपास सुरु होता. पण, चोर काही सापडले नाही. त्यानंतर पोलिसांना खब-याकडून थोडी माहिती मिळाली. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक पाडेकर, पोलि सुर्यवंशी, पोना समाधान चव्हाण, पोशि जाधव, कांदळकर, गेहे, कु-हाडे, ढाकणे यांची टीम तयार करून तपास करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील एका आरोपीस ताब्यात घेऊन त्याचेकडे कसून तपास केला असता त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाला. त्याची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाकडुन मंजुर करून घेण्यात आले. त्याचेकडे पोलीस कोठडीदरम्यान अधिक तपास केला असता त्याने त्याचे इतर साथिदारामार्फत गुन्हा केल्याचे सांगितले. त्यानंतर या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. या आरोपींनी गुन्हयात चोरी केलेला मुद्देमाल भंगार दुकानदारांना विकले असल्याचे सांगितले. त्यानंतर भंगार दुकानदाराला ताब्यात घेवून त्याच्याकडून गुन्हयात चोरी गेलेला २२ लाख रुपय किंमतीचे कॉपर, ५ लाख किंमतीचा जेसीबी, ६ लाख रु किंमतीची बोलेरो पिकअप, ६ लाख रूपये किंमतीच्या दोन चारचाकी गाड्या, १५ हजार रुपये किंमतीची बाईक, ४ हजार रुपये किंमतीचा कटर मशीन, ६ हजार रुपये किंमतीचा व्हिल बॅरी असा एकुण ३९ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्मीक, पोलीस उप आयुक्त, (परिमंडळ-२) श्रीमती मोनिका राउत, सहा, पोलीस आयुक्त, (अंबड विभाग) शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक पाडेकर, पोशि सुर्यवंशी, पोना समाधान चव्हाण, पोलिस शिपाई जाधव, कांदळकर, नेहे, कु-हाडे, ढाकणे यांनी पार पाडली.