नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मैत्रीत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एकाने तरूणीवर तब्बल चार वर्ष बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरूणाचा अतिरेक वाढल्याने युवतीने पोलिसात धाव घेतली असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साजिद शफिक शेख (२५ रा.अंबड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरूणाचे नाव आहे. संशयित व पीडित तरूणी एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात मैत्री होती. २०२० मध्ये संशयिताने तरूणीला त्र्यंबकेश्वर येथील एका लॉजवर नेत मैत्रीत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने बलत्कार केला.
त्यानंतर ब्लॅकमेल करीत संशयिताने आपल्या घरी मुलीस बोलावून घेत वारंवार अतिप्रसंग केला. सलग चार वर्षापासून संशयिताकडून लैंगिक छळ सुरू असून त्याचा अतिरेक वाढल्याने युवतीने पोलिसात धाव घेतली आहे. पोलिसांनी संशयितास तात्काळ बेड्या ठोकल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.