शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या तपोवन व म्हसरूळ विद्युत उपकेंद्राना आयएसओ मानांकन

by India Darpan
जानेवारी 2, 2024 | 5:12 pm
in स्थानिक बातम्या
0
Photo 00002 1 e1704195695163

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –२०२४ या नवीन वर्षाची सुरुवात महावितरणच्या नाशिक मंडळात असलेल्या तपोवन व म्हसरूळ येथील दोन्ही विद्युत उपकेंद्रांना एकाचवेळी आयएसओ मानांकन प्राप्त करून झाली आहे. यासाठी येथील अभियंते, यंत्रचालक व सहकाऱ्यांनी कमी कालावधीत संघटितपणे अथक परिश्रम आणि कालबद्ध कृती आराखडा राबून हे यश प्राप्त केले आहे. ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडीत सेवा देण्यासाठी कमी कालावधीमध्ये उपकेंद्रामध्ये केलेले भरीव कार्य कौतुकास्पद असून याची इतरांनी प्रेरणा घेऊन या नवीन वर्षात महावितरणच्या नाशिक परिमंडलातील सर्व विद्युत उपकेंद्रे आणि कार्यालये यांना आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी संपूर्ण क्षमतेने प्रयत्नरत राहण्याचे आवाहन नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले.

ते महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ मधील पंचवटी उपविभागाअंतर्गत असणाऱ्या ३३/११ के.व्ही. म्हसरूळ आणि तपोवन या विद्युत उपकेंद्राला आयएसओ ९००१:२०१५ मानांकन मिळाले त्यानिमित्त आयोजित आयएसओ मानांकन कोनशिलाचे अनावरण ३३/११ के.व्ही. तपोवन उपकेंद्र येथे १ जानेवारी रोजी त्यांचे हस्ते करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना मुख्य अभियंता दिपक कुमठेकर बोलत होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंते चेतन वाडे, शैलेश जैन, राजाराम डोंगरे, माणिकलाल तपासे, केशव काळूमाळी व निलेश चालिकवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण धनाईत हे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता चेतन वाडे आणि त्यांच्या सहकार्यांनी गतिमानतेने उत्कृष्ट कार्य केले आहे. राज्यातील पहिले आयएसओ नाशिक परिमंडलातील मुंगसरा विद्युत उपकेंद्र ठरले असून या कार्याचा आदर्श घेऊन निकोप स्पर्धा निर्माण व्हावी आणि कर्मचाऱ्यांना दैनंदिन कार्यात शिस्त लागावी यासाठी आयएसओ मानांकन प्राप्त करून हे व्रताप्रमाणे जपावे, त्यामुळे महावितरणची गतिमान सुधारणा होईल असा विश्वास मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी व्यक्त केला.

आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी येथील अभियंते, यंत्रचालक, जनमित्र तथा सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले असून त्यामुळे या भागातील ग्राहकांना दर्जेदार व अखंडित सेवा मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे सर्वाना मानकाप्रमाणे कार्य करण्याची सवय निर्माण होणार आहे. हे मानक टिकवणे सुद्धा एक आव्हान असून अशाप्रकारे इतरांनी सुद्धा आयएसओ करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे, त्यांना सर्वतोपरी मदत केल्या जाईल असे प्रतिपादन नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले.

आयएसओ मानांकन प्राप्त झाल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला असून यापुढे विभागातील सर्वच कार्यालये तथा उपकेंद्रे आयएसओ करून ग्राहक सेवेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे आश्वासन नाशिक शहर विभाग १ चे कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी दिले.

दोन्ही विद्युत उपकेंद्रांना आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल पंचवटी उपविभागाचे अभियंते, यंत्रचालक व जनमित्रांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.सोहळ्याला सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे व लक्ष्मण वसावे, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, कार्यकारी अभियंता नंदकिशोर काळे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे आणि अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण धनाईत, सहाय्यक अभियंता रविंद्र इप्पर व राखी जैन तसेच हेमंत खांबेकर, श्याम निर्भवने, अविनाश अहिरे व दिपक कासव यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचवटी शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता चंदन पिंपळे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन यंत्रचालक भूषण सोनवणे सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन तपोवन उपकेंद्राचे यंत्रचालक अविनाश अहिरे यांनी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव;पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन……मुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा

Next Post

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

India Darpan

Next Post
unnamed 2024 01 02T172029.777

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011